विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चंदनउटी पूजेची सांगता
By Admin | Updated: June 13, 2017 02:16 IST2017-06-13T02:16:59+5:302017-06-13T02:16:59+5:30
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने २८ मार्च ते १० जूनअखेर श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेची चंदनउटी पूजा करण्यात आली होती़ या पूजेतून मंदिर समितीला

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चंदनउटी पूजेची सांगता
- लोकमत न्यूज नेटवर्क
पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने २८ मार्च ते १० जूनअखेर श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेची चंदनउटी पूजा करण्यात आली होती़ या पूजेतून मंदिर समितीला एकूण २० लाख ७० हजार १५५ रुपयांचा निधी प्राप्त झाला़ सोमवारी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी डॉ़ विजय देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून चंदनउटी पूजेची सांगता करण्यात आली.
गतवर्षीच्या तुलनेत चंदनउटी पूजेस यंदा भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला़ गतवर्षी रुक्मिणीमातेस २१ तर श्री विठ्ठलास ८४ चंदनउटी पूजा झाली होती़ त्यातून मंदिर समितीकडे १४ लाख १७ हजार ६०५ रुपयांचा निधी जमा झाला होता़ यंदा श्री रुक्मिणीमातेस ३४ तर श्री विठ्ठलास १२१ चंदनउटी पूजा झाली असून, त्यातून २० लाख ७० हजार १५५ रुपयांचा निधी जमा झाला आहे़