हवामान बदलाच्या अभ्यासासाठी संयुक्त समिती स्थापन करा
By Admin | Updated: July 9, 2016 01:31 IST2016-07-09T01:31:13+5:302016-07-09T01:31:13+5:30
आपण स्वत:ला शेतकऱ्यांची मुले म्हणवून घेतो. पण, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी किती प्रयत्न आणि विचार करतो. हवामानातील बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे

हवामान बदलाच्या अभ्यासासाठी संयुक्त समिती स्थापन करा
मुंबई : आपण स्वत:ला शेतकऱ्यांची मुले म्हणवून घेतो. पण, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी किती प्रयत्न आणि विचार करतो. हवामानातील बदल आणि जागतिक तापमान वाढीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हवामान बदलाचा अभ्यास करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याची सूचना विधान परिषदेचे नवनियुक्त सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शुक्रवारी राज्य सरकारला केली.
विधान परिषदेत सभापतींच्या अभिनंदनपर प्रस्तावाला उत्तर देताना रामराजे नाईक-निंबाळकर बोलत होते. दोन्ही सभागृहातील बहुतांश सदस्य शेतकरीवर्गातील आहेत. मात्र जागतिक तापमान वाढ, हवामान बदलामुळे सध्या शेती आणि शेतकरी संकटात आहे. तत्कालीक उपाययोजना केल्या जात असल्या तरी दीर्घकालीन उपाय योजण्याची आवश्यकता आहे, असे निंबाळकर म्हणाले. (प्रतिनिधी)