शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
3
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
4
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
5
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
6
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
7
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
8
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
9
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
10
शाळेजवळ डान्सबार, बघे पोलिस, कारवाई मनसेवर
11
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
12
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
13
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
14
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
15
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
16
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
17
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
18
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
19
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
20
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार

राजीनाम्याबाबत अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने धनंजय मुंडेंची कोंडी; नेमकं काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 10:50 IST

अजित पवारांच्या या नव्या वक्तव्याने धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

NCP Ajit Pawar: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा थेट संबंध अद्याप आढळलेला नाही, असा दावा ते करतात. मात्र, यापूर्वी अनेक प्रकरणात आरोप झाल्यानंतर माझ्यासह अनेकांनी नैतिकता म्हणून राजीनामा दिला होता, याची आठवण करून देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिकता म्हणून मुंडे यांनी राजीनामा द्यावा किंवा देऊ नये याबाबत त्यांनाच विचारा असं मत नाशिकमध्ये बोलताना व्यक्त केलं आणि राजीनाम्याचा चेंडू मुंडे यांच्याच कार्टात टोलवला. अजित पवारांच्या या नव्या वक्तव्याने धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बीडमधील अत्यंत निंदनीय काळिमा फासणारी आहे, जे कोणी दोषी असतील त्यांना पाठीशी घातले जाणार नाही असे सांगून या प्रकरणात एसआयटी, सीआयडी, न्यायालयीन चौकशी केली एवढ्या एजन्सी नेमल्या आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील दोषींवर कारवाई होईलच असे सांगितलं आहे, अजित पवार म्हणाले. आपल्यावर २०१० मध्ये जलसंपदामंत्री असताना घोटाळ्याचा आरोप झाला. त्यावेळी आपण राजीनामा दिला तसे अनेकांनी राजीनामे दिले आहेत. केवळ रेल्वे अपघात झाला म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर अनेक अपघात झाले; परंतु रेल्वे मंत्र्यांनी राजीनामे दिले का, असे सांगत त्यांनी अनेक प्रकरणात अनेकांनी राजीनामे दिले आहेत याचे स्मरण करून दिले. 

धनंजय मुंडे यांच्याबाबत बोलताना मात्र, त्यांनी ते महाराष्ट्रात काय चालले आहे, हे ते पाहत आहेत, त्यांनाच यासंदर्भात प्रश्न विचारा, असे ते म्हणाले. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीबाबत देखील त्या दोघांना माहीत, असे अजित पवार म्हणाले. लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार पुढील हप्ते लाभार्थीना दिले जातील. नाशिक- पुणे रेल्वे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून मार्गात काही बदल करण्याच्या सूचना आहेत.

भुजबळ अनुपस्थितउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या दौऱ्यात पक्षाचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ मात्र अनुपस्थित होते. पक्षात प्रत्येक जण आपल्या कामात असतात. मी कोर्ट इमारतीच्या उद्दघाटनासाठी आलो आहे. निमंत्रण पत्रिकेत कोणाला बोलवावे आणि कोणाचे नाव नाही हे सांगू शकत नसल्याचेही पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण