शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 16:09 IST

Shiv Sena Shinde Group And Thackery Group News: ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात जाणाऱ्या माजी नगरसेवक, नेते, पदाधिकारी यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Shiv Sena Shinde Group And Thackery Group News: आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, असा कयास बांधला जात आहे. विधानसभेतील विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे. तर महाविकास आघाडी पराभवाचा वचपा काढण्यासाठी सर्व जोर पणाला लावत आहे. परंतु, यातच ठाकरे गटाला पडलेले पक्ष गळतीचे भगदाड वाढताना पाहायला मिळत आहे.

 शिंदेसेना शिंदे गट व उद्धवसेना हे दोन्ही पक्ष वर्धापनदिनाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आहेत. विशेष करून मुंबईत पालिका निवडणुकीपूर्वी या सोहळ्यांना महत्त्व आहे. विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्यानंतर एकामागून एक माजी नगरसेवक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सामील होताना दिसत आहेत. पक्षाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. परंतु, आता ही गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पक्ष सोडून जाऊ नये, यासाठी ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी शर्थीचे प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अन्यथा महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, असा कयास बांधला जात आहे. 

तू कुठेही जायचे नाहीस, मोहरे रोखण्याचा प्रयत्न

उद्धवसेनेतील जेवढे मासे गळाला लावता येतील तेवढे लावण्यासाठी गेले २० दिवस शिंदेसेनेच्या नेत्यांनी रात्रीचा दिवस केला. उद्धवसेनेतील अस्वस्थ नेते हेरून त्यांना रात्री अनोळखी क्रमांकावरून फोन करत मेळाव्यात प्रवेशाची ऑफर दिली. उद्धवसेनेला याची कुणकुण लागताच या पक्षाचे नेतेही रात्री जागून काढू लागले. एखाद्या नेत्याला फोन आला हे कळताच उद्धवसेनेचे नेते फोन करून 'तू कुठेही जायचे नाहीस', यासाठी दबाव, विनंती सुरू आहे. शिंदेसेनेला 'आपण किती मोहरे फोडले' हे दाखवायचे आहे. तर उद्धवसेनेला 'आपण किती मोहरे रोखले' हे दाखवायचे आहे, असा हा खेळ आहे, अशी माहिती मिळाली आहे. 

दरम्यान, ठाकरे गट आणि मनसे यांची युती होऊ शकते, याबाबत दोन्ही बाजूंनी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. इतकेच नव्हे, तर नेतेही सकारात्मक दिसत आहेत. परंतु, दोन्ही पक्षाचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे नेमका निर्णय कधी घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकीकडे मनसेशी युतीबाबत चर्चा आणि दुसरीकडे रिकामा होत असलेला पक्ष या दोन्ही आघाड्यावर ठाकरे गटाला लढावे लागत असल्याचा सूर राजकीय वर्तुळातून उमटत आहे.

 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे