मुख्याध्यापक महासंघाचे अधिवेशन
By Admin | Updated: October 27, 2014 02:37 IST2014-10-27T02:37:50+5:302014-10-27T02:37:50+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ५४वे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे पार पडणार आहे

मुख्याध्यापक महासंघाचे अधिवेशन
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ५४वे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे पार पडणार आहे. २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभानगर, नाशिक येथे महामंडळाचे
अध्यक्ष अरुण थोरात यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होणार असल्याचे प्रवक्ते प्र्रशांत रेडीज यांनी सांगितले.
शैक्षणिक प्रश्न व समस्यांवर दरवर्षी महामंडळामार्फत अधिवेशन आयोजित करण्यात येते. या वर्षीचे ५४वे अधिवेशन नाशिक येथे होणार आहे. या अधिवेशनामध्ये विविध शैक्षणिक विषयांवर शोधनिबंध सादर केले जाणार आहेत. शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर उपाय सुचविणार
असून, त्याचा ठराव सरकारकडे पाठविण्यात येईल. संमेलनाध्यक्ष सुभाष माने व स्वागताध्यक्ष समिती नीलिमाताई पवार यांच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्यातील उत्कृष्ट शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या मुध्याध्यापकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)