शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

१०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी; विनामूल्य सेवेला १० वर्षे पूर्ण

By दीपक भातुसे | Updated: July 7, 2024 07:11 IST

‘डायल १०८’ रुग्णवाहिकेची सेवा राज्यातील कोट्यवधी रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायिनी ठरली

ग्रामीण आणि निमशहरी भागात रुग्णांना उपचारासाठी किंवा रुग्णालयात नेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. दुर्गम आदिवासी भागात तर रुग्णांचे सर्वाधिक हाल होत होते; मात्र महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (एमईएमएस) या प्रकल्पांतर्गत २६ जानेवारी २०१४ रोजी राज्यात ‘डायल १०८’ रुग्णवाहिकेची सेवा सुरू झाली आणि राज्यातील कोट्यवधी रुग्णांसाठी ही सेवा जीवनदायिनी ठरली आहे. ही सेवा सुरू होऊन आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत. कुणी आजारी असेल, अपघात झाला असेल किंवा तातडीच्या वैद्यकीय सेवेची गरज असेल तेव्हा १०८ रुग्णवाहिका विनामूल्य सेवेसाठी तत्पर असते. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग व भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी इंडिया) संयुक्त विद्यमाने ही सेवा मागील १० वर्षे राज्यात ठिकठिकाणी चालविण्यात येत आहे. या दहा वर्षांच्या कालावधीत राज्यात १०८ रुग्णवाहिकेमध्ये ४०,२१३ प्रसूती करण्यात आल्या आहेत. तसेच ४,०३४ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासाची (व्हेंटिलेटर) सुविधा देण्यात येऊन त्यांचे प्राण वाचविण्यात आले आणि रुग्णालयात हलवण्यात आले.

१,००,०३,४४६ रुग्णांना मिळाली सेवा

राज्यात कोणत्याही ठिकाणावरून मोबाईल अथवा दूरध्वनीवरून १०८ क्रमांक डायल करताच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना विनामूल्य आणि वेळेत रुग्णवाहिका सेवा देण्यात येते. सेवा सुरू झाली तेव्हापासून जून २०२४ पर्यंत अपघाती घटनांमध्ये रुग्णवाहिकेमधून ५,२२,६८२ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. 

९७% रुग्णांकडून उत्कृष्ट अभिप्राय

या सेवेचा फायदा झालेल्या ९७% रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी प्रणालीसाठी उत्कृष्ट अभिप्राय दिला आहे. या सेवेला एसकेओसीएचद्वारे (सरकारमधील योगदानाची मान्यता देणारी संस्था) भारतातील सर्वोत्तम शासित प्रणाली म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. 

२०२३ मध्ये बीव्हीजी-एमईएमएसला दक्षिण आशियातील सर्वोत्कृष्ट कार्यान्वित आणि व्यवस्थापित प्रकल्प म्हणून ‘द रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड सर्वेअर्स’द्वारे सन्मानित करण्यात आले आहे. ३ ऑगस्ट २०२३ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात बीव्हीजी इंडिया लिमिटेडला या सेवेसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

जागतिक दर्जाच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने एमईएमएस शोधनिबंधाची निवड केली आहे. ‘नेचर’, जे सर्वोत्तम वैज्ञानिक नियतकालिकांपैकी एक आहे, ज्यामध्ये एमईएमएसवर वैज्ञानिक अहवाल प्रकाशित झाला आहे.

राज्यात ९३७ रुग्णवाहिका

राज्यात सध्या अशा ९३७ रुग्णवाहिका असून सर्व रुग्णवाहिकेत पल्स ऑक्सिमीटर, मेडिकल ऑक्सिजन यंत्रणा सज्ज असते. ही देशातील अविरत २४ तास डॉक्टर व अत्यावश्यक वैद्यकीय सुविधेसह असणारी एकमेव यंत्रणा आहे.

नाशिक येथील महाकुंभमेळा कालावधीत १,०७,२०० रुग्णांना सेवा दिली असून पंढरपूरच्या वारीमध्ये २,८९,६४६ आणि गणपती उत्सवात ४,६८४ रुग्णांना सेवा दिली आहे. कोरोनाच्या कठीण काळातही ही सेवा जीवनदायी ठरली आहे.

रुग्णांना सेवा 

राज्यात १ कोटी ३ हजार ४४६ रुग्णांना सेवा मिळाली आहे 

२९,२५३आगीच्या घटना  ७५,५९३हृदयरोग  १,५८,६४८उंचावरून पडून जखमी  २,३२,४२६विषबाधा प्रकरण १६,५६,०९४ प्रसूतीवेळी सेवा ६,९४९ शॉक किंवा वीज पडून जखमी  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार