नाशिकमध्ये डंपर -टेम्पोच्या अपघातात एक गंभीर
By Admin | Updated: July 16, 2016 22:24 IST2016-07-16T22:24:32+5:302016-07-16T22:24:32+5:30
मुंबई - आग्रा महामार्गावरील इनायत कॅफेसमोरील उड्डाणपुलावर बंद पडलेल्या डंपरवर टेम्पो आदळून झालेल्या अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाल्याची घटना

नाशिकमध्ये डंपर -टेम्पोच्या अपघातात एक गंभीर
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 16 - मुंबई - आग्रा महामार्गावरील इनायत कॅफेसमोरील उड्डाणपुलावर बंद पडलेल्या डंपरवर टेम्पो आदळून झालेल्या अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे टेम्पोत अडकलेल्या चालकास अग्निशमन दलाने दरवाजा तोडून बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले़ दरम्यान या चालकास उपचारासाठी आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे़
मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साडेसात वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिकला येणारा श्रीनाथ अर्थ मुव्हर्सचा डंपर (एमएच १२, एचडी ४९१३) हा इनायत कॅफेसमोरील उड्डाणपुलावर बंद पडला़ त्यावेळी पाठिमागून आलेल्या कोंबड्यांची वाहतूक करणाºया रिकाम्या टेम्पोने या डंपरला धडक दिल्याने तिची काच तुटली़ मात्र, संबंधित टेम्पोचालक तिथून गेला़ यानंतर आलेल्या कोंबड्यांची वाहतूक करणारा दुसरा रिकामा टॅम्पोही (एमएच ०४, ३७७२) या डंपरवर आदळला़
या अपघातात टेम्पोचा चालक मुजाराम मेटकर (रा़शहापूर) हा गंभीररित्या अडकल्याने त्यास बाहेर निघणेही मुश्किल असल्याने जोरजोरात ओरडत होता़ या घटनेची माहिती अग्निशमन दलास मिळताच लिडींग फायरमन इक्बाल शेख, फायरमन तानाजी भास्कर, घनश्याम इंफाळ, शिवाजी खुळगे, उदय शिर्के, वाहनचालक देवीदास इंगळे तसेच सहायक पोलीस आयुक्त डॉ़राजू भुजबळ आदींसह वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले़
अग्निशमन दलाच्या जवानांनी टेम्पोचा दरवाजा तोडून जखमी चालक मेटकरला बाहेर काढल्याचे त्याचे प्राण वाचले़ यानंतर त्यास अधिक उपचारासाठी आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले़ या अपघाताची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)