वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा नाही - श्वेता शालिनी

By Admin | Updated: June 27, 2017 20:47 IST2017-06-27T20:47:51+5:302017-06-27T20:47:51+5:30

भाजपाने नेहमीच छोट्या राज्यांचे समर्थन केले आहे.

Separate Vidarbha is not BJP agenda - Shweta Shalini | वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा नाही - श्वेता शालिनी

वेगळा विदर्भ हा भाजपचा अजेंडा नाही - श्वेता शालिनी

ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 27 - भाजपाने नेहमीच छोट्या राज्यांचे समर्थन केले आहे. मात्र, सध्याच्या स्थितीत वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा नसल्याचे वक्तव्य भाजपाच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

कर्जमाफी जाहीर केल्यानंतर कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर पहिल्यांदाच जिल्ह्यात आल्यामुळे त्यांचा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी श्वेता शालिनीही त्यांच्यासोबतच होत्या. सत्कार कार्यक्रमानंतर श्वेता शालिनी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी श्वेता शालिनी म्हणाल्या, की सध्या महाराष्ट्राच्या विकासाकडे भाजप लक्ष देत आहे. भाजप सुरूवातीपासूनच छोट्या राज्यांना समर्थन देत असते.

मात्र, सध्या भाजपच्या अजेंड्यावर वेगळा विदर्भ नसल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने सुरूवातीपासूनच वेगळ्या विदर्भाला समर्थन दर्शविले आहे. मात्र, सत्ता आल्यावर विदर्भवासियांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, अ‍ॅड. दीपक पाटील, जिल्हा परिषद सभापती श्वेता महाले, विधानसभा प्रमुख योगेंद्र गोडे, विश्वनाथ माळी, उदय देशपांडे, अरविंद होंडे, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्ष विजया राठी, वैशाली राठोड, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांची उपस्थिती होती.

Web Title: Separate Vidarbha is not BJP agenda - Shweta Shalini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.