शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी 'मातोश्री'ने धाडलं खासगी विमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 14:18 IST

एखाद्या आमदाराला शिवसेनेत प्रवेश देण्यापूर्वी संपर्क प्रमुख, खासदार, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो.

शिवाजी पवार

श्रीरामपूर : शिवसेना व भारतीय जनता पक्षातील नेते काँग्रेस व राष्ट्रवादीतील नेत्यांना प्रवेशासाठी पायघड्या टाकत आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना पक्षात घेण्यापूर्वीच शाहीथाटात पाहूणचार केला. कांबळे यांचा राजीनामा विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे पुण्याला जाऊन सुपूर्द करण्यासाठी ठाकरे यांनी मुंबईतून खासगी चार्टर विमान दिले. त्यामुळे शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे व संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे यांनाही धक्का बसला आहे.रविवारी रात्री आमदार कांबळे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, शिवसेना नेते सचिन बडधे हे कांबळे यांच्या समवेत उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तेथे कांबळे यांच्या समवेत ठाकरे यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. आठ दिवसांपूर्वी कांबळे यांच्याशी पक्षप्रवेश व उमेदवारी देण्यावर सविस्तर चर्चा झाली होती. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचाीही या निर्णयामागे मोठी भूमिका राहिली. त्यानंतर रविवारी त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 

एखाद्या आमदाराला शिवसेनेत प्रवेश देण्यापूर्वी संपर्क प्रमुख, खासदार, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो. त्यांची मते जाणून घेतली जातात. श्रीरामपूरच्या बाबतीत कांबळे यांच्या प्रवेशाने मात्र अनेकांना धक्का बसला आहे. कारण खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ.चेतन हे स्वत: येथून उत्सुक होते. संपर्क प्रमुख आमदार दराडे हे सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव व येवला बाजार समितीचे माजी सभापती देविदास निकम यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र आमदार कांबळे हे सर्वांवर भारी ठरले आहेत. 

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: कांबळे यांना प्रवेश दिला. रविवारी मातोश्रीवर बैैठक आटोपल्यानंतर कांबळे यांचा काँग्रेसचा राजीनामा देण्याचे निश्चित झाले. मात्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे पुण्याला होते. तेथून ते चार दिवसांकरिता कामानिमित्त बाहेर जाणार असल्याचे समजले. त्यानंतर मात्र कमालच झाली. आमदार कांबळे यांना मुंबईतून रात्री सात वाजता पुण्याला बागडे यांच्याकडे रवाना करण्याचा निर्णय झाला. ठाकरे यांनी खासगी चार्टर विमान दिले. समवेत मिलिंद नार्वेकर यांनाही पाठविले. नार्वेकर, रावसाहेब खेवरे, सचिन बडधे हे आमदार कांबळे यांच्या समवेत पुण्याला आले. रात्री दहा वाजेच्या दरम्यान पुणे विमानतळावरच कांबळे यांनी बागडेंकडे राजीनामा सुपूर्द करत काँग्रेसला जय महाराष्ट्र केला. त्यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे