सेन्सेक्स पोहोचला २७ हजारांपार
By Admin | Updated: July 2, 2016 04:11 IST2016-07-02T04:11:45+5:302016-07-02T04:11:45+5:30
विदेशी बाजारांतील सकारात्मक वातावरण आणि देशांतर्गत बाजारांतील खरेदीचा जोर यामुळे शुकवारी तेजीचे राज्य राहिले.

सेन्सेक्स पोहोचला २७ हजारांपार
मुंबई : विदेशी बाजारांतील सकारात्मक वातावरण आणि देशांतर्गत बाजारांतील खरेदीचा जोर यामुळे शुकवारी तेजीचे राज्य राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७ हजार अंकांचा टप्पा ओलांडून वर सरकला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४१ अंकांनी वाढला.
३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स 0.५४ टक्क्यांनी म्हणजेच १४५.१९ अंकांनी वाढून २७,१४४.९१ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी 0.४९ टक्के म्हणजेच ४0.६0 अंकांनी वाढून ८,३२८.२५ अंकांवर बंद झाला.
मुंबई शेअर बाजारात बड्या कंपन्यांसोबतच मध्यम आणि छोट्या कंपन्यांच्या समभागांतही खरेदीचा जोर पाहायला मिळाला. बीएसई मीडकॅप १.२0 टक्क्यांनी म्हणजेच १४0.३४ अंकांनी वाढून ११,८५७.८६ अंकांवर बंद झाला. स्मॉलकॅप 0.७१ टक्क्यांनी म्हणजेच ८४.११ अंकांनी वाढून ११,८८५.४३ अंकांवर बंद झाला.
सकाळी सेन्सेक्स ६५ अंकांच्या वाढीसह २७ हजार अंकांच्या वर उघडला होता. मधल्या काळात विक्रीचा जोर वाढल्याने तो थोडासा घसरला होता. तथापि, नंतर तो पुन्हा वर चढल्याचे दिसून आले. निफ्टीही सकाळी २६ अंकांच्या वाढीसह उघडला होता.
बीएसईमधील २,८५१ कंपन्यांच्या समभागांत व्यवसाय झाला. त्यातील १,५६९ कंपन्यांचे समभाग वाढले, तर १,१३८ कंपन्यांचे समभाग घसरले. १४४ कंपन्यांचे समभाग आदल्या सत्राच्या पातळीवर स्थिर राहिले. (प्रतिनिधी)