सेन्सेक्स @ २३०००
By Admin | Updated: May 9, 2014 22:43 IST2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T22:43:28+5:30
शुक्रवारी निर्देशांकाने उसळी घेत ऐतिहासिक सर्वोच्चांकाला स्पर्श केला.

सेन्सेक्स @ २३०००
मुंबई : देशामध्ये स्थिर सरकार येईल, अशा आशयाचे संकेत देणारे अहवाल गोल्डमन सॅच तसेच पीआरजीसारख्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थांनी काही महाकाय उद्योगांना दिल्यानंतर शेअर बाजारात शुक्रवारी निर्देशांकाने उसळी घेत ऐतिहासिक सर्वोच्चांकाला स्पर्श केला. दिवसभरात निर्देशांकात तब्बल ६५० अंशांची वाढ झाली आणि बाजार बंद होतेवेळी सर्वाधिक २२,९९४.२३ अंशावर बंद झाला. २५ एप्रिल रोजी निर्देशांकाने २२,९३९.३१ पर्यंत मजल मारली होती.
इफेक्ट कसला?
भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेन्द्र मोदी यांनी गुरुवारी मुलाखतीत बहुमाताचा विश्वास व्यक्त केला होता.
पाठोपाठ शुक्रवारी रालोआच्या पारड्यात वजन टाकणारे संकेत आर्थिक सर्वेक्षण कंपन्यांनी दिले.