शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या भेटीनंतर भाजपा-मनसे युतीबाबत सूतोवाच; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 13:39 IST

जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मी राज ठाकरेंशी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नये असं बावनकुळेंनी सांगितले.

मुंबई - कौटुंबिक संबंधातून राज ठाकरेंची मी भेट आहे. राजकीय अर्थ काढू नका. युतीबाबत जो काही निर्णय घ्यायचा तो केंद्रातील नेतृत्व राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा, अमित शाह, देवेंद्र फडणवीस हे घेतील. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून भाजपा कशी वाढेल हीच माझी जबाबदारी, युतीबाबत जी भूमिका असेल ते वरिष्ठ नेते घेतील असं सांगत भाजपा-मनसे युतीबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सूतोवाच केले

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपा-मनसेची जवळीक वाढू लागली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत भाजपा नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. आज नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज यांची भेट घेतली. या भेटीनंतर बावनकुळेंनी राज ठाकरेंवर स्तुतीसुमनं उधळली. ते म्हणाले की, राज ठाकरे नेहमीच हिंदुत्वाची बाजू मांडत आलेत. हिंदुत्वाचं रक्षण करत आलेत. त्यामुळे त्यांना भेटण्यात काही गैर नाही. हिंदुत्वाचं आणि महाराष्ट्राचं रक्षण करणाऱ्या नेतृत्वाला भेटण्यात काही अडचण नाही. आजच्या भेटीचा संबंध केवळ कौटुंबिक, राजकीय नाही. राज ठाकरे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र, हिंदुत्वाचं रक्षण करणारे अत्यंत प्रामाणिक, निष्ठावान नेते आहेत. फायटर आहेत असं त्यांनी म्हटलं. 

जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मी राज ठाकरेंशी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नये. राज ठाकरे हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. राज ठाकरे नेहमी आमच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजर राहिले आहेत. आमच्याशी वैचारिक साम्य असणाऱ्या नेतृत्वाशी मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भेटतोय असं सांगत बावनकुळेंनी भाजपा-मनसे यांच्यात हिंदुत्व हा समान धागा असल्याचं एकप्रकारे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी असून कौटुंबिक प्रेमात ते सगळे विसरून गेलेत. उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी नाहीत. मी २९ वर्षापासून भाजपाचं काम करतोय त्यामुळे सांगतो की, उद्धव ठाकरे आता हिंदुत्ववादी राहिले नाहीत. त्यांनी सारेकाही सोडून दिलंय. कौटुंबिक प्रेमात सगळं विसरले आहेत. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कतृत्वाला बगल देऊन ते आपलं कार्य करतायेत. त्यांच्याबद्दल जास्त बोलता येत नाही. सध्या उद्धव ठाकरेंचे जे काही सुरू आहे ते गडबडलेल्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे नेमकी त्यांची भूमिका कोणती हे कळत नाही असा चिमटा बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना काढला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे