ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या गाडीला अपघात, सिंधुताई सुखरूप
By Admin | Updated: January 23, 2017 12:43 IST2017-01-23T11:10:53+5:302017-01-23T12:43:21+5:30
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या इनोव्हा गाडीला अपघात झाला आहे. मात्र सुदैवाने सिंधुताई पूर्णपणे सुखरुप आहेत.

ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांच्या गाडीला अपघात, सिंधुताई सुखरूप
सिंधुताई सपकाळ या एका कार्यक्रमानिमित्त रविवारी रात्री मुलगा विनयसह पुण्याहून वर्ध्याकडे वाहनातून जात होत्या. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील खादगाव शिवारात त्यांचे वाहन आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्यामुळे त्यांचे वाहन दुभाजकाला घासले गेले. सुदैवाने यात सिंधुताई यांच्यासह त्यांचा मुलगा व चालक यांना दुखापत झाली नाही. दरम्यान, अपघाताची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक राहूल माकणीकर, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद गावडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनातील तिघांचीही वैद्यकीय तपासणी केली. त्यांना कसलीही गंभीर दुखापत झाली नसल्याची खात्री पटल्यानंतर दुसऱ्या वाहनातून त्यांना वर्ध्याकडे रवाना करण्यात आले.