वरिष्ठ सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीशांची बदली

By Admin | Updated: April 28, 2017 02:08 IST2017-04-28T02:08:43+5:302017-04-28T02:08:43+5:30

अकोल्यातील चार, बुलडाण्यातील तीन, वाशिममधील दोन न्यायाधीशांची बदली

Senior Sessions Judge, District Judge Replacement | वरिष्ठ सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीशांची बदली

वरिष्ठ सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीशांची बदली

अकोला: शासनाने वरिष्ठ स्तरावरील सत्र न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीशांच्या बदल्यांची यादी गुरुवारी रात्री जाहीर केली. यामध्ये अकोल्यातील चार, बुलडाण्यातील तीन आणि वाशिम जिल्ह्यातील दोन न्यायाधीशांचा समावेश आहे. वरिष्ठ सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एन. मोरवाल यांची अकोल्यावरून जालना येथे बदली झाली. मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.डी. पिंपळकर यांची अकोल्यावरून बारामतीला, एस.सी. सिरसाट यांची बुलडाणा येथून ग्राहक तक्रार निवारण मंच औरंगाबाद येथे बदली झाली आहे. मुंबईचे डी.पी. शिंगाडे हे मुंबईवरून अकोल्यात येणार आहेत. तसेच पुणे येथून न्यायाधीश एन.जी. शुक्ला यांची अकोला येथे, संतोष पी. देशमुख यांची वाशिमवरून सोलापूरला, सोलापूर येथून पी.डी. मोरे यांची अकोल्यात बदली झाली तर न्यायाधीश पी.एम. बिडगी यांच्या अकोल्यावरून मुंबईला बदली झाली. तसेच जिल्हा न्यायाधीशांच्याही बदल्या करण्यात आल्या असून, यात एस.एस. शर्मा यांची बीडवरून बुलडाणा, न्यायाधीश ए.एस. कलोटी यांची बुलडाण्यावरून मुंबईला, ए.के. शाह यांची वाशिम येथून पुण्याला, ए.डी. क्षीरसागर यांची ठाणे येथून बुलडाण्याला बदली झाली. तसेच न्यायाधीश पी.एल. गजभिये यांची बुलडाण्यावरून धुळे येथे, जी.जी. भालचंद्र यांची अकोल्यावरून रिटेनला तर व्ही.एस. देशपांडे यांची जालना येथून वाशिमला बदली करण्यात आली आहे.

Web Title: Senior Sessions Judge, District Judge Replacement