ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, विचारवंत यशवंत सुमंत यांचे निधन
By Admin | Updated: April 11, 2015 14:44 IST2015-04-11T14:44:22+5:302015-04-11T14:44:45+5:30
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, विचारवंत यशवंत सुमंत यांचे निधन

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, विचारवंत यशवंत सुमंत यांचे निधन
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ११ - ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सुप्रसिद्ध विचारवंत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. यशवंत सुमंत यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचारांचे व राज्यशास्त्राचे ते गाढे अभ्यासक व मार्गदर्शक होते.
गेल्या चार महिन्यांपासून आजारी असलेल्या डॉ. सुमंत यांची प्रकृती गुरूवारी खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
'डॉ. सुमत यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हाच त्यांच्या हृदयाचे कार्य बंद ढआले होते. त्यांच्यावर तातडीने उपचार करून हृदयाचे कार्य पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र त्याच्या मेंदुला होणारा रक्तपुरवठा थांबला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र दुर्दैवाने उपचारांना यश मिळाले', असे डॉ. समीर जोग यांनी सांगितले.