वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बदल्या
By Admin | Updated: August 3, 2014 00:29 IST2014-08-03T00:29:53+5:302014-08-03T00:29:53+5:30
राज्य शासनाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या शनिवारी सायंकाळी बदल्या जाहीर केल्या.

वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या बदल्या
पुणो : राज्य शासनाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिका:यांच्या शनिवारी सायंकाळी बदल्या जाहीर केल्या. पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी याबाबतचे आदेश दिल्यानंतर तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ बदलीची वाट पाहणा:या अधिका:यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कारकीर्द गाजवणारे अधीक्षक सारंग आवाड हे पुणो शहर पोलीस दलात बदलून आले आहेत. तर, वाहतूक उपायुक्त म्हणून पुण्यात यशस्वी कारकीर्द निभावणारे विश्वास पांढरे यांची बदली नवी मुंबईला करण्यात आली आहे.
जालिंदर सुपेकर यांची सीआयडीहून जळगावच्या अधीक्षकपदी वर्णी लावण्यात
आली आहे. तर, सांगलीचे
अतिरिक्त अधीक्षक डी. पी. प्रधान
यांची पुणो लाचलुचपत प्रतिबंधक
विभागाच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.
व्ही. एन. देशमाने यांची नाशिकच्या अतिरिक्त अधीक्षकपदावरून पुणो सीआयडीमध्ये बदली करण्यात आली आहे. मरोळहून पी. आर. पाटील यांचीही सीआयडी पुणो येथे बदली करण्यात आली
आहे. रेल्वेचे अतिरिक्त अधीक्षक एस. जी. सोनवणो यांची महामार्ग पोलिसांच्या पुणो विभागाच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे. डॉ. जय जाधव हे औरंगाबादहून राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून बदलून आले आहेत. येत्या काही दिवसात आणखी काही अधिका:यांची बदल्या अपेक्षित आहेत़ (प्रतिनिधी)
सरदेशपांडे नांदेडला तर पाठक, रानडे पुण्यात
परिमंडल दोनचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांची बदली पुण्याहून नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. तर, विशेष शाखेचे उपायुक्त प्रदीप देशपांडे यांची बदली नाशिक सीआयडीला करण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मकरंद रानडे यांची पुन्हा पुण्यामध्ये बदली करण्यात आली आहे. यासोबतच राज्य गुप्तवार्तामध्ये नेमणुकीस असलेले ज्ञानेश्वर चव्हाण यांची बदली लातूरचे अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याचे अधीक्षक अंकुश शिंदे यांची सीआयडीला बदली झाली आहे. नवी मुंबईचे उपायुक्त एस. व्ही. पाठक यांची पुणो शहरात बदली झाली आहे. आणखी काही बदल्या अपेक्षित आहेत.