शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

...तर मी योग्य निर्णय घेण्यास सक्षम, राजन साळवींचं सूचक विधान; वरिष्ठांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 19:43 IST

माझ्या मतदारसंघातील अनेक मंडळी, पदाधिकारी यांनी तुम्ही योग्य निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत असे संकेत दिले आहेत असंही राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी - कोकणात माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गट सोडण्याचे संकेत दिले आहेत. राजापूर आणि लांजा तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर राजन साळवी यांनी पक्षातील वरिष्ठ नेते माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत असा आरोप करत भविष्यात योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यास मी सक्षम आहे असं थेट विधान केले आहे. 

लांजा येथील कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर राजन साळवींनी माध्यमांशी संवाद साधला. साळवी म्हणाले की, गेले काही दिवस प्रसारमाध्यमातून विविध चर्चा रंगल्या आहेत. मला पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आमच्याशी संवाद साधावा. त्यानंतर मी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यात राजन साळवी यांच्यावर अन्याय झालेला आहे असा सूर कार्यकर्त्यांचा होता. पराभवाला कारणीभूत अनेक मंडळी आहेत. तुम्ही योग्य तो निर्णय घ्या अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. त्यावेळी मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला. लांजा येथील पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली. भविष्यात योग्य वेळी योग्य तो निर्णय निश्चित घेईन अशा भावना मी कार्यकर्त्यांसमोर मांडल्या आहेत असं त्यांनी सांगितले.

त्याशिवाय माझ्या पराभवाला कारणीभूत काही वरिष्ठ मंडळी आहेत. मी त्यांचे नाव घेणार नाही. ते शोधणे गरजेचे आहे. आज जो दु:खाचा डोंगर पक्षावर, माझ्यावर वैयक्तिक माझ्या कुटुंबावर आला याला कारणीभूत कोण आहेत हे शोधणे गरजेचे आहे. जर नाही शोधले तर भविष्यात आज जी माझ्यावर वेळ आली आहे ती अन्य कुणावरही येऊ शकते. ती वेळ येऊ नये त्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाने निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी मी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास मी सक्षम आहे. माझ्या मतदारसंघातील अनेक मंडळी, पदाधिकारी यांनी तुम्ही योग्य निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत असे संकेत दिले आहेत असंही राजन साळवी यांनी म्हटलं आहे.

२४ तासानंतर राजन साळवींचा यू टर्न?

मागील काळात कोकणातील माजी आमदार राजन साळवी पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. त्यावर गुरुवारी राजन साळवी यांनी भाष्य केले. ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ मध्ये झालेल्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो. पराभवाचे दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्याकडेही शिवसेना मार्गक्रमण करत आहे. मीडियातून मला समजले की, मी नाराज आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसे काही नाही. रोजच्या कामात माझे मार्गक्रमण सुरू आहे. अशा बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही, असे राजन साळवी यांनी सांगितले होते. त्यानंतर आज साळवींनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना