ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील कालवश
By Admin | Updated: September 10, 2014 03:25 IST2014-09-10T03:25:53+5:302014-09-10T03:25:53+5:30
ठाण्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील यांचे सोमवारी सकाळी ८ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील कालवश
ठाणे : ठाण्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील यांचे सोमवारी सकाळी ८ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. त्यांनीच उभारलेल्या कळवा येथील न्यू कळवा हायस्कूलच्या पटांगणात मंगळवारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
दुपारी २.३० वाजता त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. ४ वा.च्या सुमारास त्यांच्यावर मनीषानगर येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ठाणे शहर पोलिसांच्या वतीने त्यांना गोळीबाराच्या तीन फैरींची सलामी दिली; तर शासनाच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे प्रतिनिधी म्हणून वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी कावेरीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त समजताच ठाणे परिसरात शोककळा पसरली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)