ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, दलितमित्र माधवराव सावंत यांचे निधन
By Admin | Updated: March 5, 2017 20:59 IST2017-03-05T20:21:00+5:302017-03-05T20:59:14+5:30
ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आणि दलितमित्र माधवराव सावंत यांचे आज निधन झाले.

ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते, दलितमित्र माधवराव सावंत यांचे निधन
ऑनलाइन लोकमत
मुंबई दि. 5 - ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आणि दलितमित्र माधवराव सावंत यांचे आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांचे ते वडील होते.
माधवराव सावंत यांना 1995 साली दलितमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. रायगड सहकारी बँकेसह विविध सहकारी संस्था त्यांनी उभारल्या. सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल वसंतदादा पाटील पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते जवळचे स्नेही होते. रायगड जिल्ह्यात राजकीय आणि सहकारी क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली आणि दोन मुले, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.
सोमवारी 6 मार्च रोजी सकाळी 10 वा. सावंत किटुंबियांचे निवासस्थान 301, सत्यम टॉवर , 90 फुट रोड, एचडीएफसी बँकेच्या मागे, ठाकूर पॉलिटेक्नीक कॉलेज जवळ, ठाकूर कॉम्पलेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई. येथून अंत्ययात्रा निघेल व दौलतनगर स्मशानभूमी बोरिवली येथे अंतिम संस्कार केले जातील.