ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन अत्यवस्थ
By Admin | Updated: October 7, 2015 05:01 IST2015-10-07T05:01:23+5:302015-10-07T05:01:23+5:30
ज्येष्ठ संगीतकार व गायक रवींद्र जैन यांना रविवारी येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

ज्येष्ठ संगीतकार रवींद्र जैन अत्यवस्थ
नागपूर : ज्येष्ठ संगीतकार व गायक रवींद्र जैन यांना रविवारी येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. रविवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना प्लाटिना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने मंगळवारी दुपारी त्यांना वोक्हार्ट रुग्णालयात हलविण्यात आले.