ज्येष्ठ नागरिकांची पारपत्र पडताळणी होणार घरीच
By Admin | Updated: July 24, 2016 21:11 IST2016-07-24T21:11:20+5:302016-07-24T21:11:20+5:30
शहरातील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा पोलिसांची जबाबदारी आहे; पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहेत.

ज्येष्ठ नागरिकांची पारपत्र पडताळणी होणार घरीच
ऑनलाइन लोकमत
पुणे : शहरातील ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा पोलिसांची जबाबदारी आहे; पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहेत. पारपत्र पडताळणीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. जर कोणाला बोलावलेच तर संबंधित वरिष्ठ निरीक्षकाचे नाव कळवा, त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा या विषयावर द इंटरनॅशनल लाँजेटिव्हीटी सेंटर इंडिया संस्थेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.. यावेळी शुक्ला बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर आणि संस्थेचे चेअरमन माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर यावेळी उपस्थित होते.
शुक्ला म्हणाल्या ह्यसध्या पोलिसांच्या हेल्पलाईनवर महिन्याला किमान दोनशे ते तिनशे तक्रारी येत असतात. या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातात. ा ज्येष्ठांना आजारपण, आर्थिक अडचण आणि एकटेपणा या तीन प्रमुख समस्यांनी ग्रासले आहे. सध्या राज्यामध्ये ६० ते ८० वर्ष वयोगटातील नागरिकांची संख्या ९.९ टक्के आहे.ह्ण
ज्येष्ठ नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात नावनोंदणी करावी. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमधील ज्येष्ठ नागरिक संस्था आणि संघटनांनी यादी तयार करुन त्यांची दर महिन्याला बैठक घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनीही त्यांच्या परिसरातील पोलिसांशी संपर्क प्रस्थापित करुन मदतीसाठी येणा-या पोलिसांना मुलांप्रमाणे वागणूक देण्याचे आवाहन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एमएसडब्लूच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचे मनुष्यबळ खुपच कमी आहे. त्यामुळे वाहतूक नियमन आणि सुधारणा यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी दिले.