शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आहे असे म्हणता येणार नाही, उद्धव ठाकरे गटाची बाजू...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 13:47 IST

Maharashtra News: राजकीय आरोप म्हणून घटनाबाह्य म्हणू शकतात. मात्र हा हुशारीने डाव टाकलेला आहे, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर आता शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. आता दोन्ही गटांकडून पक्षावर हक्क सांगितला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे-शिंदे या दोन्ही गटांना कागदपत्र सादर करण्यासाठी आणखी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. आता पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावरून कायदेतज्ज्ञांमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. 

शिंदे गटाचे आमदार एकत्र बाहेर पडले की वेगवेगळे या मुद्द्याचा विचार करावा लागेल. सुनावणीअंती शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर त्यांना मंत्रिपदी राहता येणार नाही. या १६ आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. मुख्यमंत्रीच अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आगामी सहा महिन्यांत महाराष्ट्रात पुन्हा एकदा विधानसभेची मध्यावधी निवडणूक होईल, असे घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटले आहे. तर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य आहे, असे म्हणता येणार नाही, असे म्हटले आहे. 

शिंदे-फडणवीस सरकार हे घटनाबाह्य आहे असे म्हणता येणार नाही

एका वाहिनीशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, सगळा घटनाक्रम क्रोनोलॉजिकली पाहिला तर कायदाचा विद्यार्थी म्हणून मला हे घटनाबाह्य सरकार आहे असे म्हणता येणार नाही. राजकीय आरोप म्हणाल तर शिंदे गटाचीही बाजू घ्यायची नाही आणि ठाकरे गटाचीही बाजू घ्यायची नाही, असे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले. राजकीय आरोप म्हणून घटनाबाह्य म्हणू शकतात. मात्र हा हुशारीने डाव टाकलेला आहे. सगळ्या घटना तुम्ही पाहिल्या की या फार हुशारीने खेळल्या गेल्या आहेत, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, सर्वोच्च न्यायालय म्हणेल नरहरी झिरवळ यांनी जी नोटीस पाठवली होती. त्याला या आमदारांनी ज्याच्यासमोर उत्तर दिले त्यांनी ते ठरवावे. मग ते नरहरी झिरवळ असतील किंवा नार्वेकरांनी द्यावे हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असेल. सर्वोच्च न्यायालय म्हणेल की नोटीसमध्ये स्वइच्छेने सदस्यत्व सोडण्याचा उल्लेख असेल तर त्यावर युक्तीवाद होऊ शकतो. सभागृहात चर्चा होऊ शकते. मग या विषयावर निर्णय होऊ शकतो. हा विषय पुन्हा विधिमंडळ आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकतो, असे उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे