पर्यटकांची पावले वळताहेत सिंहगडाकडे

By Admin | Updated: July 4, 2016 01:25 IST2016-07-04T01:25:14+5:302016-07-04T01:25:14+5:30

पावसाचा जोर वाढत चालल्याने खडकवासला-सिंहगड-पानशेत परीसरात आता सहलीचा हंगाम चालु झाल्याचे आज खऱ्या अर्थाने जाणवले

Sending the steps of tourists to Sinhagad | पर्यटकांची पावले वळताहेत सिंहगडाकडे

पर्यटकांची पावले वळताहेत सिंहगडाकडे


सिंहगड रस्ता : दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चालल्याने खडकवासला-सिंहगड-पानशेत परीसरात आता सहलीचा हंगाम चालु झाल्याचे आज खऱ्या अर्थाने जाणवले. रविवारी तुफान पावसातही येथे पर्यटकांची भरतीच आल्याचे आज तरी जाणवले. दिवसभर हजारो वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूककोंडीत मोठी भर पडली.
जून-जुलै महिन्यात पावसाची आतुरतेने वाट पहाणारा एक वर्ग तर पर्यटनासाठी आसुसलेला एक वर्ग असतो. वनविभाग व वनसमितीने शनिवार व रविवारी पर्यटकांना सहलीसाठी सुरळीत येता यावे या साठी विशेष तयारी व्यवस्था केली होती.
हवेली पोलिस व वनसंरक्षण समितीचे सुरक्षारक्षकांनी घाट रस्त्यातील वाहतुक व्यवस्था सुरळीत प्रयत्न केले. मात्र गर्दी अधिक असल्याने कोंडीही झाली होती. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी वाढत जाईल तशी येणाऱ्या पर्यटकांची वाहने टप्प्याटप्प्याने घाट रस्त्याने गडावर सोडण्याची व्यवस्था केली होती. गडावरुण येणाऱ्या वाहनांची संख्या पाहुनच वाहने गडावर सोडली जात होती. सकाळी अकरा नंतर खडकवासला परीसरात गर्दी वाढत गेली. चौपाटीचे जवळ धरणालगत रस्त्याचे पाणी ओढ्यावर आल्याने मोठी कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहंंचालकांची तारांबळ उडाली. अनेक दुचाकीचालक या तुंबलेल्या पाण्यात घसरुन पडत होते.
>पर्यटक उतरले पाण्यात
पोलिसांनी कोंडी होऊ नये यासाठी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना हातगाड्या लावु दिल्या नव्हत्या. विक्रेत्यांनी सूचना मान्य करुन बैठा व्यवसाय सुरु ठेवल्याने वाहतूक सुरळीत ठेवता आली. शेंगा, कणीस, भजी व भेळपुरीवाल्यांंच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत होती. शेकडो पर्यटक धरणाच्या पाण्यात उतरुन मनसोक्त पोहताना दिसत होते. सिंहगड व पानशेतची दिवसभराची सहल करुन दुपारनंतर खडकवासला धरणांवर येऊन थांबत असल्याने चौपाटीवर प्रचंड गर्दी दिसुन आली. वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

Web Title: Sending the steps of tourists to Sinhagad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.