मोबाईलवरुन पाठवा खड्ड्यांचे छायाचित्र; १ जूनपासून पालिका आणणार अ‍ॅप

By Admin | Updated: May 20, 2016 21:20 IST2016-05-20T21:20:19+5:302016-05-20T21:20:19+5:30

खड्डे शोधण्यासाठी गेली पाच वर्षे प्रभावी ठरलेल्या पोटहोल ट्रॅकिंग सिस्टमचे कंत्राट संपल्यामुळे पालिकेने आता मोबाईल अ‍ॅप आणण्याची तयारी केली आहे़.

Send pictures of potholes from mobile phones; The app launches from June 1 | मोबाईलवरुन पाठवा खड्ड्यांचे छायाचित्र; १ जूनपासून पालिका आणणार अ‍ॅप

मोबाईलवरुन पाठवा खड्ड्यांचे छायाचित्र; १ जूनपासून पालिका आणणार अ‍ॅप

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० :  खड्डे शोधण्यासाठी गेली पाच वर्षे प्रभावी ठरलेल्या पोटहोल ट्रॅकिंग सिस्टमचे कंत्राट संपल्यामुळे पालिकेने आता मोबाईल अ‍ॅप आणण्याची तयारी केली आहे़.  त्यानुसार १ जूनपासून मुंबईकर आपल्या वॉर्डातील खड्ड्याचे छायाचित्र काढून अ‍ॅपद्वारे विभाग कार्यालयापर्यंत पोहोचवू शकतील़ दरवर्षी पावसाळ्यात मुंबई खड्ड्यात जाते़ हे खड्डे पालिका बुजवत असली तरी छोट्या रस्त्यांवरील खड्डे दुर्लक्षितच राहतात़ त्यामुळे २०११ मध्ये पालिकेने पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टम आणले़ त्यानुसार खड्ड्याचे छायाचित्र मोबाईलवरुन काढून थेट या संकेतस्थळावर पाठविणे शक्य होत .  

खड्डे शोधण्याच्या या अनोख्या मोहिमेला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला होता़ या संकेतस्थळावर वरिष्ठांचे लक्ष असल्यामुळे ४८ तासांमध्ये खड्डे बुजविण्याची खबरदारी अभियंता घेत होते़ मात्र १ एप्रिल २०१६ पासून या संकेतस्थळाचे कंत्राट संपले़ मात्र ही मोहीम प्रभावी असल्याने अखेर पालिका प्रशासन अ‍ॅपद्वारे खड्डे शोध मोहिमेला पुनर्जीवित करणार आहे़ अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी आज दिली़ प्रतिनिधी

खड्डे कमी झाले़

दोन वर्षांपूर्वी मुंबईत ४० हजार खड्ड्यांची नोंद झाली होती़ मात्र खड्डे त्वरित भरण्यात येत असल्याने तसेच रस्त्यांची नियमित डागडुजी व रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरु असल्याने गेल्यावर्षी केवळ सहा हजार खड्डे आढळून आले असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे़ असा होईल अ‍ॅपचा वापर अ‍ॅपल किंवा अ‍ॅनरॉईड मोबाईलवरुन नागरिकांनी त्यांच्या वॉर्डातील खड्ड्याचे छायाचित्र काढावे़ हे छायाचित्र जीपीएसद्वारे संबंधित वॉर्डाकडे पोहचेल़ मात्र छायाचित्र उदा़ दहिसरमध्ये काढून मालाडमध्ये आल्यानंतर पाठविण्याचा प्रयत्न केल्यास तो जाणार नाही़ या अ‍ॅपचा सध्या प्रयोग सुरु आहे़

Web Title: Send pictures of potholes from mobile phones; The app launches from June 1