सेनेकडे लाचारी पत्करण्याशिवाय पर्याय नाही- अशोक चव्हाण

By Admin | Updated: July 5, 2016 18:02 IST2016-07-05T18:02:28+5:302016-07-05T18:02:28+5:30

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर टीका केली आहे.

Sena has no choice but to take the helplessness - Ashok Chavan | सेनेकडे लाचारी पत्करण्याशिवाय पर्याय नाही- अशोक चव्हाण

सेनेकडे लाचारी पत्करण्याशिवाय पर्याय नाही- अशोक चव्हाण

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 5- केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आहे. मात्र या विस्तारात शिवसेनेला वाटाण्याच्या अक्षता दाखवण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकारावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेलाही लक्ष्य केलं आहे. शिवसेनेला सरकारमध्ये राहून लाचारी पत्करण्याशिवाय पर्याय नाही. मंत्रिमंडळ विस्तार फक्त संख्यात्मक, गुणात्मक नाही, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे. पॅकेज जाहीर केलं मात्र त्याचा जनतेला काहीच फायदा झाला नाही. कर्ज न मिळाल्यानं शेतक-यांनी पेरण्या केल्या नसल्याचं यावेळी अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Web Title: Sena has no choice but to take the helplessness - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.