सेल्फीच्या नादात जीव गमावला
By Admin | Updated: July 10, 2016 00:41 IST2016-07-10T00:41:59+5:302016-07-10T00:41:59+5:30
उंच पुलावरून सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणाने जीव गमावला. मोहम्मद दानिश मोहम्मद असरार असे त्याचे नाव असून तो बोरियापूरा परिसरात राहत होता.

सेल्फीच्या नादात जीव गमावला
महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू : बुटीबोरी जवळ दुर्घटना
नागपूर : उंच पुलावरून सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणाने जीव गमावला. मोहम्मद दानिश मोहम्मद असरार असे त्याचे नाव असून तो बोरियापूरा परिसरात राहत होता.
दानिश आणि त्याचे नातेवाईक तसेच मित्र परिवार एका कार्यक्रमासाठी शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास वर्धा जिल्ह्यात जात होते. बुटीबोरी समोर गेल्यानंतर एका पुलावर त्यांनी वाहन थांबविले. तेथे गप्पा गंमत करीत दानिश आणि त्याचे मित्र सेल्फी काढू लागले. उंचावर चढलेला दानिश संतुलन बिघडल्याने खोल भागात पडला आणि गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रांनी त्याला लगेच बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला नागपुरात नेण्याचा सल्ला दिला. दानिशला नागपुरात आणले जात असताना त्याचा मार्गातच मृत्यू झाला. या घटनेमुळे बोरियापुरा भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.