सेल्फी बेतला जिवावर

By Admin | Updated: February 13, 2016 23:46 IST2016-02-13T23:46:09+5:302016-02-13T23:46:09+5:30

नाशिक येथून वालदेवी धरणावर फिरण्यासाठी आलेल्या दोघा शाळकरी मुलांचा सेल्फी काढण्याच्या नादात धरणात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी दोघांचेही मृतदेह सापडले.

Selfie Betla Jivavar | सेल्फी बेतला जिवावर

सेल्फी बेतला जिवावर

घोटी : नाशिक येथून वालदेवी धरणावर फिरण्यासाठी आलेल्या दोघा शाळकरी मुलांचा सेल्फी काढण्याच्या नादात धरणात बुडून मृत्यू झाला. सायंकाळी दोघांचेही मृतदेह सापडले.
वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील यांच्यासह हवालदार युवराज आहिरे यांनी स्थानिक युवकांच्या मदतीने मुलांचा शोध घेतला. नाशिक येथील १५ शाळकरी मुले शनिवारी दुपारी वालदेवी धरणावर फिरण्यासाठी आली होती. त्यातील अजिंक्य भाऊसाहेब गायकर (१८, उपेंद्रनगर, नाशिक) व सौरभ चुळभरे (१८, सिडको, नाशिक) हे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धरणाच्या कठड्यावर सेल्फी काढण्यात दंग असताना त्यातील एकाचा अचानक तोल जाऊन तो धरणात पडला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्न करताना दुसरा मुलगाही पाण्यात पडला. (वार्ताहर)

Web Title: Selfie Betla Jivavar