पाण्यासाठी आत्मदहनाचा इशारा
By Admin | Updated: June 8, 2016 03:18 IST2016-06-08T03:18:46+5:302016-06-08T03:18:46+5:30
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील दोघांनी पंचायत समितीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

पाण्यासाठी आत्मदहनाचा इशारा
अहमदनगर : पाइपलाईनद्वारे पिण्यासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी मंगळवारी नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील दोघांनी पंचायत समितीसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, अंगावर रॉकेल ओतून घेत असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. येथील लोखंडे वस्ती आणि परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. मुक्ताई मंदिर ते लोखंडे वस्ती पाईपलाईन टाकून पाणी द्यावे, ही नागरिकांची मागणी अनेक वर्षे राजकीय वादात अडकली आहे.