संभाजी ब्रिगेडतर्फे आत्मक्लेश

By Admin | Updated: August 20, 2015 22:52 IST2015-08-20T22:52:55+5:302015-08-20T22:52:55+5:30

पुरंदरेंना पुरस्कार : शिवाजी पुतळ्यासमोर जाहीर माफी

Self-appeal by Sambhaji Brigade | संभाजी ब्रिगेडतर्फे आत्मक्लेश

संभाजी ब्रिगेडतर्फे आत्मक्लेश

सांगली : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना राज्य शासनाने ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडतर्फे गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन त्यांनी जाहीर माफीही मागितली. शिवरायांचा खरा इतिहास समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत केले जाईल, अशी शपथ घेतली.ब्रिगेडने माफीनाम्यात म्हटले आहे की, आम्ही सर्वजण जड अंत:करणाने आत्मक्लेशाने पीडित होऊन तसेच आपणासमोर नतमस्तक होऊन जाहीर माफी मागत आहोत. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब व आपली तसेच कुणबी स्त्रिया, मराठे सरदार आणि त्यांच्या आया-बहिणींची बदनामी करणाऱ्यांना आज राजमान्यता मिळाली आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. आम्ही तुम्हा सर्वांची बदनामी रोखण्यात अपयशी ठरलो आहोत. तुम्हा सर्वांचा बदनामीकारक, विकृत लिहिलेला खोटा इतिहास मिटेपर्यंत आजपासून प्रबोधनाच्या माध्यमातून लोकशाही मार्गाने खरा इतिहास समाजातील तळागाळातील पोहोचविण्याचे काम अखेरच्या श्वासापर्यंत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.
या आंदोलनात डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, विनायक पाटील, नरेंद्र देसाई, राहुल जाधव, प्रशांत पवार, प्रशांत सूर्यवंशी, प्रमोद सारनाथ, बाळा सावंत, राहुल पाटील, महेश घाडगे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Self-appeal by Sambhaji Brigade