रीओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पांगरेच्या सुयशची निवड
By Admin | Updated: September 5, 2016 17:01 IST2016-09-05T17:01:38+5:302016-09-05T17:01:38+5:30
तालुक्यातील पांगरे येथील अपंग जलतरणपटू सुयश जाधव (वय २२) याची ब्राझील येथील रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी जलतरण प्रकारात निवड झाली आहे.

रीओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पांगरेच्या सुयशची निवड
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
करमाळा, दि. ५ - तालुक्यातील पांगरे येथील अपंग जलतरणपटू सुयश जाधव (वय २२) याची ब्राझील येथील रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी जलतरण प्रकारात निवड झाली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत जलतरणात निवड झालेला सुयश हा पहिला भारतीय खेळाडू असून त्याच्या या यशाबद्दल तालुक्यातून आनंद व्यक्त केला जात आहे.
लहाणपणी वीज धक्क्याच्या एका अपघातानंतर दोन्ही हात कोपराजवळून कापावे लागल्यानंतर अपंग बनलेल्या सुयशने वडील नारायण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणामध्ये उल्लेखनीय कौशल्य प्राप्त केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांतून सातत्याने पदाकांची लयलुट करणारा सुयश आता पॅरालिम्पिक स्पर्धेत यश मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.
७ ते १८ सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी भारत देशाचे १९ सदस्यांचे पथक रवाना झाले असून या पथकात समाविष्ट असलेला सुयश ५० मीटर बटरफ्लाय,५० मीटर फ्रि स्टाईल,२०० मीटर अशा तीन प्रकारात सुयश देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.भारतीय प्रमाण वेळेनुसार ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी,१२ सप्टेंबरला सायंकाळी आठ वाजता,१३ सप्टेंबरला सहा वाजून तेहातीस मिनिटांनी सुयश सहभागी असलेल्या स्पर्धा होणार आहेत.
सदर स्पर्धेत सुयश देशासाठी पदक नक्की जिंकेल.असा विश्वास त्याचे वडील नारायण जाधव यांनी व्यक्त केला आहे.तर,करमाळा तालुक्याच्या ग्रामीण भागातील अपंग खेळाडूने मारलेली झेप अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया अपंगांचे नेते आ.बच्चू कडू यांनी दिली आहे. सुयशच्या या यशाच्या पार्श्वभूमीवर अपंगांचे नेते आ.बच्चू कडू,आ.नारायण पाटील,भटक्या विमुक्त संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रामकृष्ण माने,अर्बन बँकेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी,अमित जागते यांनी अभिनंदन केले आहे.