गोवा राष्ट्रीय महामार्गावर बीजारोपण

By Admin | Updated: June 30, 2016 02:52 IST2016-06-30T02:52:50+5:302016-06-30T02:52:50+5:30

१ जुलैला राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला

Seeding on Goa National Highway | गोवा राष्ट्रीय महामार्गावर बीजारोपण

गोवा राष्ट्रीय महामार्गावर बीजारोपण


अलिबाग : कृषीदिनी शुक्रवारी १ जुलैला राज्यात दोन कोटी वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धनास मदत करण्याचा संकल्प राज्याच्या वन विभागाने केला आहे. याच दिवशी ‘लोकमत’च्या वतीने ‘गोवा राष्ट्रीय महामार्ग दुतर्फा बीजारोपण मोहिमेचे’ आयोजन के लेआहे.
महामार्गाच्या बाजूच्या राज्यातील पहिल्याच बीजारोपण मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी १ जुलै रोजी सकाळी आठ वाजता विसावा (महाड) येथे ेआमदार भरत गोगावले व शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाडचे अध्यक्ष अ‍ॅड.संतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर पळस्पे (पनवेल) येथे माजी आमदार विवेक पाटील व व्ही.जी.पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबागचे प्रमुख वैभव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत एकाच वेळी होणार आहे. विसावा (महाड) येथील उपक्रमाकरिता सफर केंद्र आणि सावली गोशाला, आसनपोई-महाड आणि शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड या दोन संस्थांचे तर पळस्पे (पनवेल) येथे व्ही.जी.पाटील एज्युकेशन फाऊंडेशन, खिडकी-अलिबाग व भारत पेट्रोलियम वैभव आॅटोमोबाईल्स, पळस्पे-पनवेल या दोन संस्थांचे सहकार्य लाभले आहे. ‘लोकमत’नेही गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा आगळी मोहीम हाती घेण्यात आल्याचे कळल्यावर खरंच आनंद वाटला, असे वनस्पती शास्त्र तज्ज्ञ डॉ.अनिल पाटील म्हणाले.
>कशी आहे मोहीम...
गोव्याकडे खासगी वाहन चालक व त्यातील प्रवाशांना पळस्पे (पनवेल) येथे तर मुंबईकडे जाणाऱ्या खासगी वाहन चालक व त्यातील प्रवाशांना विसावा (महाड) येथे बीजे (बिया) देण्यात येणार आहेत. यामध्ये आंब्याचे बाठे, करंज, जांभूळ, फणस आदि झाडांच्या बियांचा समावेश आहे.
प्रवासादरम्यान पळस्पे (पनवेल) ते इंदापूर (महाड) या दरम्यान गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाकरिता संपादित मार्ग जागेच्या बाजूला आपली गाडी सुरक्षित ठिकाणी थांबवून महामार्गाच्या डाव्या बाजूस हे बीजारोपण करुन, प्रवासी पर्यावरण संवर्धनाच्या या राष्ट्रीय कर्तव्यात आपला सहभाग देतील. बीजाचे रुजून त्याचे झाड करण्याचे पुढील काम नैसर्गिकरीत्या पडणाऱ्या पावसाने पूर्ण होणार आहे. बीजारोपण करतानाचा आपला फोटो व्हॉट्सअ‍ॅप द्वारे ८००७८९८००८ या क्रमांकावर हे प्रवासी पाठवून आपल्या सहभागाची खातरजमा देतील. मोहिमेच्या सुयोग्य अंमलबजावणीकरिता पळस्पे आणि महाड येथे एक माहिती पत्रक ‘लोकमत’च्या वतीने बियांसोबत देण्यात येणार आहे.

Web Title: Seeding on Goa National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.