शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

‘लोकमत आॅनलाइन’वर पहा पुरुषोत्तमचा कल्ला

By admin | Updated: July 25, 2016 01:59 IST

पुण्यासह महाराष्ट्राच्या नाट्यक्षेत्रात महत्त्वाचं स्थान असलेल्या पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची धामधूम महाविद्यालयांमध्ये सुरू झाली आहे.

पुणे : पुण्यासह महाराष्ट्राच्या नाट्यक्षेत्रात महत्त्वाचं स्थान असलेल्या पुरूषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची धामधूम महाविद्यालयांमध्ये सुरू झाली आहे. त्याच्या तालमीही सुरू झाल्या आहेत. ‘सांस्कृतिक आणि कलाक्षेत्राच्या वर्तुळातील सृजनशील अभिव्यक्ती आणि कलागुणांना अढळ जागा मिळवून देणारं हक्काचं व्यासपीठ’ असा या स्पर्धेचा नावलौकिक आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेने असंख्य कलाकारांना मोठे केले़ कलाक्षेत्रातील पहिले पाऊल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्पर्धेची धामधूम सोमवारपासून ‘लोकमत आॅनलाईन’च्या माध्यमातून सर्वांना पाहता येणार आहे़ पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला महाविद्यालयीन जगतात अनन्यसाधारण महत्त्व आहे. पन्नास वर्षांपूर्वी महाराष्ट्र कलोपासक संस्थेनं लावलेल्या स्पर्धेच्या या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालं असून, पुण्याबाहेरही स्पर्धेची बीजं रोवली आहेत. प्रायोगिक, व्यावसायिक, समांतर अशा विविधतेने बहरलेल्या रंगभूमीवर पाऊल टाकण्याचं बाळकडू कलाकारांना मिळतं, ते याच स्पर्धेतून. याच ‘पुरूषोत्तम’नं रंगभूमीला प्रतिभावान कलाकारांची एक उत्तुंग अशी यशस्वी मालिका दिली. त्यामध्ये प्रकर्षानं नाव घेता येतील, अशी मंडळी म्हणजे डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, योगेश सोमण, संजय पवार, प्रवीण तरडे, सुबोध भावे, अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी, उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे. यासारखी अनेक नावं आहेत.महाराष्ट्र कलोपासक संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूर-देसाई आणि सदस्य अमृता पटवर्धन यांनी लोकमत कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीत या स्पर्धेचा घेतलेला आढावा आपण पाहू शकता़ त्याचबरोबर बृहनमहाराष्ट्र फर्ग्युसन महाविद्यालय, कावेरी महाविद्यालय, स़ प़ महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय अशा महाविद्यालयामध्ये यंदा पुरुषोत्तमसाठी कशी तयारी सुरु आहे़ काही महाविद्यालयांच्या संघांची संहिता ठरली असून, अभिनय कार्यशाळेच्या माध्यमातून कलाकारांची निवड करण्यात आली आहे़, अशा सर्व बित्तमबातमी आपल्याला लोकमत आॅनलाईनवर पहायला मिळणार आहे़