महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर' पुरस्कार सोहळा पहा IBN लोकमत आणि ABP माझावर...!
By Admin | Updated: April 9, 2016 14:47 IST2016-04-09T09:13:43+5:302016-04-09T14:47:57+5:30
'महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर' पुरस्कार सोहळा आज ABP माझावर तर उद्या, १० एप्रिल रोजी IBN Lokmat वर आवर्जून पहा

महाराष्ट्रीयन ऑफ दि इयर' पुरस्कार सोहळा पहा IBN लोकमत आणि ABP माझावर...!
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - उद्योग, व्यवसाय, कला, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रातील तमाम दिग्गजांनी अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ पुरस्कृत ‘महाराष्ट्रीयन ऑफ द इयर’ हा ‘लोकमत’ समूहाचा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. विविध क्षेत्रांत मोलाची कामगिरी करून आपला ठसा उमटवणा-या मान्यवरांना या सोहळ्यात गौरवण्यात आले. या सोहळ्याचे संपूर्ण वृत्तांकन विविध बातम्यांद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेच आहे.
'आपल्या असामान्य कर्तृत्वाने महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडकवणारे दिग्गज आले आहेत एकाच व्यासपीठावर ! जिथे मुख्यमंत्री बनले आहेत मुलाखतकार ! जिथे आमिर खान आणि रणवीर सिंग थिरकले आहेत मल्हारीच्या ठेक्यावर ! आजपर्यंत ज्यांच्याबद्दल फक्त ऐकलच होतं त्या महाराष्ट्राच्या या 'रत्नांना' प्रत्यक्ष पहायची आणि ऐकायची दुर्मिळ संधी चुकवू नका. अजिंक्य डी. वाय. पाटील युनिवर्सिटी प्रस्तुत, पॉवर्ड बाय धूत ट्रान्स्मिशन - लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळा पहायला विसरू नका, दिनांक ९ एप्रिल २०१६ रोजी संध्या. ८.०० वाजता ‘ABP माझा’वर व दिनांक १० एप्रिल २०१६ रोजी संध्या. ८.०० वाजता IBN लोकमत वर ! महाराष्ट्राचा जयजयकार... झेंडा अटकेपार !
दिगज्जांची धमाल येत्या वीकेंडला पहायला विसरू नका...!