शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

‘त्या’ चाळीस जणांसाठी वेगळी योजना आणता येते का बघा...

By अतुल कुलकर्णी | Updated: February 26, 2023 08:17 IST

आपल्या विधिमंडळाला चांगल्या-वाईट गोष्टींचा मोठा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, त्यावेळी सभागृहात तोडफोड झाली होती.

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

नेते हो, नमस्कार.उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. त्यासाठी शुभेच्छा. वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यांच्या पोतडीतून काय योजना निघतील हे कळेलच. ते त्यांचं काम चोखपणे करतील. आपणही आपलं काम चोखपणे केलं पाहिजे. नेहमीप्रमाणे याही अधिवेशनात एकमेकांविरुद्ध जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू द्या. महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत आहे. खरे-खोटे माहिती नाही; पण कोणी एकमेकांविरुद्ध काही बोलले नाही तर त्याची बातमीच होत नाही. मात्र, आपण गोंधळ घातला, की नक्की बातम्या येतील, याची आम्हाला खात्री आहे. 

आपल्या विधिमंडळाला चांगल्या-वाईट गोष्टींचा मोठा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली, त्यावेळी सभागृहात तोडफोड झाली होती. नवाब मलिक, बशीर पटेल, सोहेल लोखंडवाला हे तिघे समाजवादी पक्षाचे सदस्य होते. श्रीकृष्ण आयोगाची अंमलबजावणी करावी म्हणून त्यांनी सभागृहात सरकारची प्रेतयात्रा काढली होती. नागपूरच्या अधिवेशनात अण्णा डांगे, बबनराव ढाकणे यांच्यात धक्काबुक्की झाली होती. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर सभागृहात गदारोळ झाल्याने ४३ आमदार एकाच झटक्यात निलंबित केले होते. नव्या सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देताना सभागृहात अध्यक्षांसमोरील माईक हिसकावून घेऊन अंगावर धावून जाण्याची परंपरा आपल्यालाच आहे. कधीकाळी जांबूवंतराव धोटे यांनी पेपरवेट भिरकावून दिल्याची घटना विधिमंडळाच्या इतिहासात घडली आहे. सभागृहात बसून सत्ताधारी सदस्यांना जेरीस आणायचे असते. प्रश्न विचारून भंडावून सोडायचे असते. असं विधिमंडळाच्या पुस्तकात लिहिलं असेल. काही जाणकारही तसंच सांगतील. मात्र, विधिमंडळाच्या बाहेर पायऱ्यांवर... मधल्या पोर्चमध्ये... समांतर अधिवेशन भरवल्याचे आपण पाहिले आहे. तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी तर सभागृह बंद पडल्यानंतर बंद सभागृहात अधिवेशन भरवले. रात्री उशिरा त्यांना बाहेर काढताना सत्ताधारी सदस्यांना नाकीनऊ आले. तो इतिहास एकदा वाचून घ्या.

या विधिमंडळात अनेक ऐतिहासिक निर्णय झाले, असे दाखले तुम्हाला काही जण देतीलही. वि. स. पागे यांनी रोजगार हमीचे धोरण याच सभागृहात पहिल्यांदा मांडले जे पुढे देशाने स्वीकारले. महिलांना निवडणुकीत आरक्षण दिले पाहिजे हा निर्णय रात्री दोन वाजेपर्यंत सभागृहाने चर्चा करून मंजूर केला होता. डान्सबार बंदीचा निर्णय याच सभागृहाने घेतला. ज्यामुळे देशोधडीला लागणाऱ्या हजारो तरुणांना वाचवले. सहकारी संस्थांचा ऐतिहासिक कायदा देशात पहिल्यांदा याच विधिमंडळात झाला होता. अशा निर्णयांची यादी तुम्हाला अनेक जण देतील; पण त्याकडे लक्ष देऊ नका. कारण आज कोणालाही असे काही निर्णय झाले होते, हे आठवत नाही. त्यांना फक्त सभागृहात झालेला गोंधळ, गदारोळ, हाणामारीच आठवते. त्यामुळे आपण त्याकडेच लक्ष द्या. ते जास्त महत्त्वाचं आहे. ‘मरावे परी कीर्तीरूपी उरावे’, ही म्हण आता कालबाह्य झाली आहे. आता ‘मारावे आणि फोटोरूपी उरावे’ अशी नवी म्हण रूढ होत आहे. त्यासाठी आपण हातभार लावला पाहिजे. 

या आधीच्या अधिवेशनात आपण गाजराच्या माळा घालून आलो होतो... म्याऊ म्याऊ असे आवाज काढले होते... खोके... बोके... गद्दार... असे शब्द संसदीय कारभारात रूढ केले होते. आता त्यापुढे जाऊन आपल्याला आणखी काही जहाल शब्द समाजात रुजवावे लागतील. त्यासाठी मराठी भाषेच्या शब्दसंग्रहात आपल्यालाच भर घालावी लागेल. शिव्यांची लाखोली हा शब्द आता कामाचा नाही. त्यामुळे थेट भिडणारे आणि आरपार जाणारे शब्द शोधून काढा. काही जुन्या शब्दांना नव्याने धार लावा. शेवटी आपल्याला चर्चेत राहायचे आहे, हे विसरू नका. चर्चेत राहण्यासाठी गोंधळ, गदारोळ याच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी केलं पाहिजे. विधान भवन परिसरात चित्रविचित्र पोशाखात येण्यापेक्षा काय वेगळं करता येतं ते पाहा. वाटल्यास रणवीरसिंहसोबत बोलून घ्या. मध्यंतरी तो खूप गाजला होता. तो काही टिप्स देऊ शकेल. जाता जाता : आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी जेवढी टीका करता येईल तेवढी करा. कसलीही सहानुभूती निर्माण होणार नाही. काळजी करू नका. शेवटी त्यांच्यावर टीका केली तरच आपलं अस्तित्व दिसेल. त्यामुळे चला, कामाला लागा. हे अधिवेशन गोंधळ, गदारोळ, शब्दांचे टोकदार बाण यासाठी कायम लक्षात राहिले पाहिजे. शक्य झाल्यास चाळीस आमदारांसाठी वेगळी व्हीव्हीआयपी व्यवस्था करा. कारण ते आहेत म्हणून सरकार आहे. त्यांना जिवापाड जपा... त्यांच्यासाठी एखादी योजना आणा... जास्तीत जास्त निधी त्यांना द्या... त्यांचे लाड, कोडकौतुक करा... कारण ते खूश तर बाकी सगळे खूश... हे विसरू नका. तुम्हाला अधिवेशनासाठी खूप खूप शुभेच्छा..!    - तुमचाच, बाबूराव

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBudgetअर्थसंकल्प 2023