निवडणूक निकाल बघा लोकमतच्या मोबाईल अॅपवर
By Admin | Updated: October 14, 2014 14:25 IST2014-10-14T13:55:09+5:302014-10-14T14:25:47+5:30
विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या व निकालाच्या दिवसांच वृत्तांकन तुमच्या तळहातावर मोबाईल अॅपच्या माध्यमातून पोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत

निवडणूक निकाल बघा लोकमतच्या मोबाईल अॅपवर
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात असून १५ ऑक्टोबरच्या मतदानयज्ञात सूज्ञ जनता कुठल्या पक्षाला संधी देईल, हे १९ ऑक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. गेले दोन महिने सुरू असलेल्या या सत्तासंघर्षाचं नि:पक्षपाती वृत्तांकन www.lokmat.com च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोचवलं आहे. आता शेवटच्या व अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याचं म्हणजे मतदानाच्या व निकालाच्या दिवसांचं संपूर्ण वृत्तांकन तुमच्या तळहातावर मोबाईल अॅपच्या माध्यमातून पोचवण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. जर, तुम्ही लोकमतचं मोबाईल अॅप डाउनलोड केलेलं असेल तर ते आजच प्लेस्टोअरमधून अपडेट करा आणि अजून तुम्ही लोकमतचं अॅप डाऊनलोड केलेलं नसेल तर प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करा.
काय आहे मोबाईल अॅपमध्ये:
- महाराष्ट्र विधानसभेच्या आत्तापर्यंतच्या म्हणजे १९६२ पासूनच्या २००९ पर्यंतच्या सर्व निवडणुकांचे निकाल.
- आत्तापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये झालेली सगळ्या पक्षांची कामगिरी.
- निवडणूक आयोगाच्या सहकार्याने मतदारयादीत तुमचं नाव शोधण्याची सुविधा.
- निवडणूक विशेष हा ताज्या बातम्यांचा विभाग.
- महाराष्ट्रातल्या प्रत्येक म्हणजे २८८ मतदारसंघांचा निवडणुकांचा इतिहास.
- आत्तापर्यंतच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा.
- वाचकांना आपलं मत व्यक्त करण्याची संधी देणारे पोल.
- २०१४च्या म्हणजे होऊ घातलेल्या निवडणुकांच्या निकालाचे १९ ऑक्टोबर रोजी लाइव्ह अपडेट्स आणि पक्षनिहाय स्थिती.