शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेत होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 19:29 IST

दुरुस्ती व नुतनीकरणासाठी ९.४२ कोटीचा निधी राज्य सरकारकडून मंजूर

- जमीर काझीमुंबई : राज्यातील विविध कारागृहातील संरक्षक भिंती, बॅरेक आता सुरक्षिततेच्या दृष्टिने आणखी मजबूत होणार आहेत. खराब व नादुरुस्त कठड्याची दुरुस्ती व नुतनीकरण करण्यासाठी तब्बल ९.४२ कोटीचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे. त्याद्वारे विविध लहान-मोठ्या १७ तुरुंगातील सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यात येणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने (पीडब्ल्यूडी) पाच महिन्यापूर्वी हा प्रस्ताव गृह विभागाला सादर केला होता. त्याला मंजुरी देताना याबाबतचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयात दोन वर्षापूर्वी दाखल असलेल्या एका जनहित याचिकेत राज्यातील कारागृहातील दुरावस्थेबद्दल सरकारला फटकारले होते. त्यानंतर सरकारकडून कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार विविध कामाची पूर्तता करण्यात येत असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.न्यायालयाच्या आदेशानंतर कारागृहातील परिस्थितीचा आढावा घेवून आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठी विशेष महानिरीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार एकुण २७ कारागृहात बांधकाम/ दुरुस्ती/नुतनीकरण करण्याबाबतचा अहवाल शासनाला सादर केला होता. त्यापैकी अत्यावश्यक असणाºया व मंजुरी मिळालेल्या १७ ठिकाणी तातडीने पीडब्ल्यूडीकडून हे काम हाती घेतले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार भायखळा कारागृहात रंगकाम गळती प्रतीबंधक उपाययोजना करण्यासाठी ३० लाख तर बॅरेक क्रमांक ३व ४ व त्या शेजारी नवीन बॅरेक बांधण्यासाठी ४० लाख खर्चात बांधण्यात येणार आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात बॅरेक बांधणे व येरवड्यातील ३९ बॅरकेच्या दुरुस्तीसाठी सुमारे ९८ लाख खर्च अपेक्षित आहे. येरवड्यातील महिला कारागृहात १०० कैदी क्षमतेचे स्वतंत्र बॅरेक बांधले जाणार असून त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई मध्यवर्ती कारागृहातील विविध बॅरेक बांधण्यासाठी एकुण ४ कोटीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता.महाराष्ट्रात एकुण ९ मध्यवर्ती कारागृहे असून त्याशिवाय जिल्हा स्तरावरील अ,ब, क व ड या चार स्तरावर ४५ असे एकुण ५४ कारागृह आहेत. त्याची अधिकृत बंदी क्षमता २३ हजार ९४२ इतकी असलीतरी प्रत्यक्षात ३१ हजार २१८ कैदी असल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामध्ये २१ हजार ८३३ पुरुष तर १३८५ महिला कैदी आहेत.जेलमधील बंदी क्षमता- २३९४२प्रत्यक्ष बंदीची संख्या- ३१२१८ 

 

टॅग्स :jailतुरुंगMaharashtraमहाराष्ट्र