मोरानी, शाहरूख यांची सुरक्षा वाढवली

By Admin | Updated: August 27, 2014 14:09 IST2014-08-27T04:48:07+5:302014-08-27T14:09:34+5:30

अंडरवर्ल्डकडून झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी निर्माते अली मोरानी आणि अभिनेता शाहरूख खान या दोघांच्या सुरक्षेत वाढ केली आ

Security of Morani, Shahrukh increased! | मोरानी, शाहरूख यांची सुरक्षा वाढवली

मोरानी, शाहरूख यांची सुरक्षा वाढवली

मुंबई : अंडरवर्ल्डकडून झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी निर्माते अली मोरानी आणि अभिनेता शाहरूख खान या दोघांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. २३ आॅगस्टला मोरानी यांच्या निवासस्थानी गोळीबार झाला होता. याआधी मोरानी यांना गँगस्टर रवी पुजारीने खंडणीसाठी धमक्या आल्या होत्या. त्यामुळे हा गोळीबारही पुजारी टोळीनेच केल्याचा संशय पोलिसांना आहे. सकाळपासून मोरानी यांच्यानंतर पुजारीने शाहरूखलाही धमकावल्याची चर्चा होती. मात्र मुंबई पोलिसांनी ती फेटाळून लावली. शाहरूख यांच्याकडून धमक्यांची तक्रार आलेली नाही, तसेच सुरक्षा वाढविण्याबाबतही अर्ज आलेला नाही, असे सहआयुक्त धनंजय कमलाकर यांनी सांगितले. मोरानी यांची सुरक्षा वाढविल्याचे मात्र त्यांनी स्पष्ट केले. अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार शाहरूखला पुरविलेली सुरक्षा खबरदारीचा उपाय आहे.
गँगस्टरची पंचाईत
गँगस्टर पुजारीने मोरानींच्या घरावर गोळीबार केला खरा मात्र मुंबई पोलिसांनी या गुन्हयाला फारशी प्रसिद्धी न दिल्याने त्याची पंचाईत झाली. अखेर गोळीबाराच्या दोन दिवसांनंतर होय मीच गोळीबार केला, अशी माहिती खुदद गँगस्टरनेच मुंबईत पसरवल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Security of Morani, Shahrukh increased!