सुरक्षेचा ‘फार्स’खाना
By Admin | Updated: July 10, 2014 22:48 IST2014-07-10T22:48:58+5:302014-07-10T22:48:58+5:30
दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या पुणो शहरावर गुप्तचर विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

सुरक्षेचा ‘फार्स’खाना
दीपक जाधव - पुणो
दगडूशेठ गणपती मंदिराची सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आल्यामुळे त्याच्या नजीकचे ठिकाण असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याचा परिसर टार्गेट केला जाण्याची दाट शक्यता असल्याचा इशारा राज्य गुप्त वार्ता विभागाने राज्य शासनाला पाठविलेल्या अहवालामध्ये काही दिवसांपूर्वीच दिला असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. तसेच, या अहवालामध्ये तेथील बेशिस्त पार्किगविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती.
दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या पुणो शहरावर गुप्तचर विभागाकडून बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. विशेषत: दगडूशेठ मंदिराला असलेला धोका लक्षात घेऊन त्याच्या सुरक्षेवर गुप्तचर अधिका:यांकडून विशेष लक्ष ठेवले जात होते. मंदिराची सुरक्षा भक्कम असली तरी फरासखाना पोलीस ठाणो परिसराच्या सुरक्षितेमध्ये ढिलेपणा असल्याचे अधिका:यांच्या लक्षात आले होते. पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये कोणीही गाडय़ा लावू शकतात, याचीही नोंद त्यांनी घेतली होती. त्यामध्ये तातडीने सुधारणा करण्यात यावी, असा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला होता, अशी माहिती गुप्तचर विभागाच्या अधिका:यांनी दिली. राज्य शासनाकडून त्यावर वेळीच कार्यवाही केली गेली असती, तर फरासखाना परिसरातील बॉम्बस्फोट रोखता आला असता. सुदैवाने स्फोटाची तीव्रता कमी राहिल्याने मोठय़ा नुकसानीस सामोरे जावे लागले नाही. मात्र, गुप्तचर विभागाच्या इशा:याकडे दुर्लक्ष करण्याची मोठी किंमत पुणोकरांना मोजावी लागू शकेल, याची खंतही त्या अधिका:यांनी व्यक्त केली.
गणोशोत्सवापूर्वी बसवा सीसीटीव्ही कॅमेरे
राज्यगुप्त वार्ता विभागाची 7 जुलै रोजी सहामाही बैठक मुंबई येथे झाली. या बैठकीमध्ये पुणो शहराच्या सुरक्षितेच्या मुद्दय़ावर बरीच चर्चा झाली. आगामी गणोशोत्सव लक्षात घेता त्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत शहरामध्ये सीसी टीव्ही बसविण्याचे काम पूर्ण केले जावे, अशी सूचना या बैठकीमध्ये करण्यात आली होती. गुप्तवार्ता विभागाने दिलेल्या इंटेलिजन्सचे किती अंदाज बरोबर आले, याचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला होता.
‘तुम्हाला या ठिकाणी कोणी बोलावले?’
फरासखाना पोलीस ठाण्यातील पार्किगमध्ये स्फोट झाल्याची घटना समजताच एक व्यक्ती त्या ठिकाणी आली. तिने त्या ठिकाणची सूत्रे हाती घेऊन पोलिसांना सूचना देण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्त सतीश माथूर घटनास्थळी आले. माथूर यांनाही त्याने अनाहूतपणो सल्ला देण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी, ‘‘आपण कोण आहात?’’ अशी विचारणा आयुक्तांनी तिला केली. या वेळी आपण निवृत्त कर्नल असल्याचे या व्यक्तीने स्पष्ट केले. ‘‘तुम्हाला या ठिकाणी कोणी बोलावले आहे?’’ असे विचारून त्या व्यक्तील आयुक्तांनी फटकारताच ती तेथून निघून गेली. तपासात बेकायदेशीरपणो होत असलेला हस्तक्षेप आयुक्तांनी थांबविला.
रेकी करूनच बॉम्बस्फोट
4पार्किगमध्ये ज्या ठिकाणी गाडी लावण्यात आली होती, त्यासमोर अत्यंत जुनी मातीचे बांधकाम असलेली दुमजली इमारत आहे. दुचाकीच्या डिक्कीमध्ये स्फोटक ठेवून ती उडवून दिल्यानंतर इमारतीला धोका पोहोचवून मोठय़ा प्रमाणात नुकसान घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा विचार असावा. मात्र, दाटीवाटीने लावलेल्या दुचाकींमुळे स्फोटाची तीव्रता कमी झाली असल्याचा अंदाज गुप्तचर अधिका:यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे स्फोट करण्यापूर्वी फरासखाना परिसराची बारकाईने रेकी केली गेल्याचे त्यांनी सांगितले.
फरासखान्याचे स्कॅनर मशीन धूळ खात
फरासखाना इमारतीमध्ये विo्रामबाग व फरासखाना पोलीस ठाणो, तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त, एक पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त यांची कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच लोकांची वर्दळ असते. या इमारतीला लागूनच दगडूशेठ मंदिर आहे. हा परिसर कायम दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिलेला आहे. दगडूशेठ मंदिरामध्ये यापूर्वी कतिल सिद्दिकीने बॉम्बची बॅग ठेवण्याचा प्रय} केल्याचे उघडकीस आल्यानंतर दगडूशेठ मंदिराची सुरक्षा मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात आली. मात्र, याचबरोबर फरासखाना इमारतीच्याही सुरक्षिततेची काळजी घेणो आवश्यक असताना त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले. दगडूशेठ मंदिर व फरासखाना इमारत या दोन्हींसाठी दोन अत्याधुनिक स्कॅनर मशीन एका कंपनीने भेट दिली आहेत. दगडूशेठ मंदिरातील स्कॅनर मशीन व्यवस्थित सुरू असताना फरासखान्याचे मशीन मात्र धूळ खात पडलेले आहे.
भय इथले संपत नाही..
कोरेगाव पार्कातील जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पुणो आपले ‘टार्गेट’ असल्याचे दहशतवाद्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर देखाव्यासाठी सतर्क राहिलेल्या पोलिसांना जंगली महाराज मार्गावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने चांगलाच झटका दिला. हे स्फोट जर्मन बेकरीएवढे धोकादायक नव्हते; पण या स्फोटांमध्ये सुरक्षा यंत्रणोच्या चिंधडय़ा उडाल्या. याची तीव्रता अथवा त्यात वापरलेली स्फोटके, याची काहीही माहिती न घेता हा खोडसाळपणा असल्याचे विधान तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी केले होते. यावरूत ते अडचणीत आले खरे; पण आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिका:याच्या या विधानावरून सुरक्षा आणि विशेषकरून दहशतवादी कारवाया पोलीस किती सहजतेने घेतात, हेच स्पष्ट झाले. दगडूशेठ मंदिरासारख्या प्रचंड वर्दळीच्या आणि धार्मिक भावना जुळलेल्या ठिकाणी दहशवादी हल्ल्याची शक्यता अनेकदा वर्तविण्यात आली. वास्तविक, असे संकेत मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कायमस्वरूपी दक्ष राहण्याची गरज होती. मात्र, दहशतवाद्यांनी दगडूशेठ मंदिराच्या नजीक आणि फरासखाना पोलीस ठाण्याच्या दारात पोलीस कर्मचा:याचीच गाडी उडवून सुरक्षा यंत्रणोची खिल्ली उडवली. या स्फोटाची तीव्रता कमी होती खरी; पण पुण्यात दहशवाद्यांच्या धोक्याची तीव्रता मात्र या घटनेने वाढविली आहे, हे नक्की.
पोलिसांचा नाकर्तेपणा पुन्हा उघड
दिल्ली पोलिसांनी जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या बॉम्बस्फोटाचा छडा लावून पुणो शहरातील इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटेनेचे जाळे उजेडात आणले. दहशतवादाची पाळेमुळे किती खोलवर रूजली आहेत ते पुढे आले. पुणो शहर पोलिसांचे स्वतंत्र असे पुणो दहशतवाद व नक्षलवाद विरोधी पथक आहे. मात्र, या पथकांच्या स्थापनेपासून आतार्पयत एकदाही यशस्वी कार्यवाही झालेली नाही. ही पथके नेमकी करतात काय, असा प्रश्न आहे. गुप्तचर विभागाकडून आलेले इशारे पुणो पोलिसांकडून गांभीर्याने घेतले जात नाहीत. यामुळेच शहरात जर्मन बेकरी, जंगली महाराज रोड आणि त्यानंतर फरासखाना परिसरात तिसरी बॉम्बस्फोट मालिका घडविण्यात दहशतवादी यशस्वी झाले आहेत.