युतीला धर्मनिरपेक्ष पक्ष रोखणार - अन्वर

By Admin | Updated: September 7, 2014 02:01 IST2014-09-07T02:01:48+5:302014-09-07T02:01:48+5:30

शंभर दिवसांमध्येच देशाला कळून चुकले आहे की, आपण चुकीच्या लोकांची निवड केली आहे.

The secular party will protect the alliance - Anwar | युतीला धर्मनिरपेक्ष पक्ष रोखणार - अन्वर

युतीला धर्मनिरपेक्ष पक्ष रोखणार - अन्वर

औरंगाबाद : शंभर दिवसांमध्येच देशाला कळून चुकले आहे की, आपण चुकीच्या लोकांची निवड केली आहे. देशात जातीयवाद पसरवून सत्तेत येणो हा एकमेव कार्यक्रम भाजपाचा सुरू आहे. महाराष्ट्रात सेना-भाजपा युतीला रोखण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्ष सक्षम आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी शनिवारी पत्र परिषदेत व्यक्त केला.
मागील काही दिवसांपासून देशात अराजकता पसरविण्यात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसने ‘कौमी तन्जीम’ या संघटनेला सोबत घेऊन जिथे जिथे जातीय तेढ निर्माण करण्यात आली आहे, तिथे तिथे आम्ही काम करीत आहोत. मराठवाडय़ातही याच उपक्रमांतर्गत आपण आल्याचे अन्वर यांनी नमूद केले.
ते म्हणाले की, बिहार, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाची ‘क्रेझ’ संपल्याचे दिसून आले आहे.  मागील काही दिवसांमध्ये भाजपा नेत्यांची भाषणो ऐकल्यावर जातीयवादाला कशा पद्धतीने खतपाणी घालण्यात येत आहे, हे लक्षात येते. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक जण पक्ष सोडून दुस:या पक्षात जात असल्याबद्दल पत्रकारांनी त्यांना छेडले असता ते म्हणाले की, पक्ष बदलण्याचा आजार फक्त राष्ट्रवादीलाच नाही. सर्वच पक्षांना लागला आहे.  (प्रतिनिधी)

 

Web Title: The secular party will protect the alliance - Anwar