सचिव मोठे की मंत्री?

By Admin | Updated: May 14, 2015 03:43 IST2015-05-14T03:43:49+5:302015-05-14T03:43:49+5:30

विधानसभेत मंत्र्यांनी घोषित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सचिव आडकाठी आणत असतील तर सचिव मोठे आहेत की मंत्री याचा एकदाचा सोक्षमोक्ष

Secretary of the big minister? | सचिव मोठे की मंत्री?

सचिव मोठे की मंत्री?

अतुल कुलकर्णी, मुंबई
विधानसभेत मंत्र्यांनी घोषित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सचिव आडकाठी आणत असतील तर सचिव मोठे आहेत की मंत्री याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावा, अशा शब्दांत नाराजी व्यक्त करीत अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सचिवांना चांगलेच धारेवर धरले. महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनीही त्यांना साथ दिली.
मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक सुरू होताच बापट यांनी चिठ्ठीवर विषय लिहून आपल्याला बोलायचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी नंतर पाहू, असे सांगत दुसरा विषय काढला. तेव्हा चिडलेल्या बापटांनी नंतर कशाला, असे म्हणत बोलायलाच सुरुवात केली. त्यावर मंत्र्यांनी सचिवांशी चर्चा करून निलंबनासारख्या गोष्टी कराव्यात, असे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी सांगताच बापट आणखी संतप्त झाले. विधानसभेत विरोधकांच्या माऱ्याला आम्ही तोंड द्यायचे आणि कारवाईची मागणी झाली की तुम्हाला येऊन विचारायचे का, असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Secretary of the big minister?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.