मनसेचे दरेकर, गिते, रमेश पाटील यांच्यात गुप्त चर्चा
By Admin | Updated: November 9, 2014 01:50 IST2014-11-09T01:50:13+5:302014-11-09T01:50:13+5:30
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेत नाराजी नाटय़ उफाळले आहे.

मनसेचे दरेकर, गिते, रमेश पाटील यांच्यात गुप्त चर्चा
डोंबिवली : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसेत नाराजी नाटय़ उफाळले आहे. या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी डोंबिवलीत माजी आमदार प्रवीण दरेकर, वसंत गिते आणि रमेश पाटील यांची गुप्त बैठक झाली, परंतु ती वैयक्तिक स्वरूपाची होती, राजकीय नव्हती, असा दावा दरेकर यांनी केला. आपण या बैठकीला उपस्थित नव्हतो, असे पाटील यांनी सांगितले. मनसेच्या ‘नाराज’ पदाधिका:यांच्या या बैठकीतून कोणती गणिते जुळून येतात, याकडे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला जुन्नर वगळता इतरत्र पराभवाचा सामना करावा लागला. अनेक उमेदवारांना तर अनामत रकमाही वाचवता आल्या नाहीत. मनसेअंतर्गत नाराजी उफाळली असताना माजी आमदार व पक्षाचे सरचिटणीस प्रवीण दरेकर यांनी राजीनामा देऊन या नाराजीला तोंड फोडल़े त्यानंतर, हे नाराजी नाटय़ थेट नाशिकर्पयत पोहोचले आणि माजी आमदार वसंत गीते यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ माजी आमदार रमेश पाटील यांच्या डोंबिवलीतील हॉटेलमध्ये गीते आणि दरेकर पाटील एकत्र आल्याने नाराजीच्या चर्चेला पुन्हा उधाण
आले आहे. गिते आणि दरेकर हे भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा असून पाटील यांची भूमिकादेखील लवकरच स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत.
च्बैठक राजकीय नव्हती. वैयक्तिक स्वरूपाची होती. मी नाराज नाही. पक्षातच राहणार असून कार्यकर्ता म्हणून काम करणार आह, असे मनसेचे माजी आमदार प्रवीण
दरेकर यांनी सांगितले.
च्माङया हॉटेलमध्ये बैठक
झाली असली तरी माझा संबंध नाही़ मी उपस्थित नव्हतो़ बैठक पदाधिका:यांची होती. मी सामान्य कार्यकर्ता आहे, असे माजी आमदार रमेश पाटील म्हणाले.