मराठी पत्रकारांना दुय्यम वागणूक

By Admin | Updated: August 15, 2015 00:28 IST2015-08-15T00:28:38+5:302015-08-15T00:28:38+5:30

मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा विकास करण्यासाठी स्थापित असलेल्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडूनच (एमआरव्हीसी) मराठीशी दुजाभाव केला. एमआरव्हीसीतर्फे आयोजित एका पत्रकार परिषदेसाठी

Secondary abuse of journalists | मराठी पत्रकारांना दुय्यम वागणूक

मराठी पत्रकारांना दुय्यम वागणूक

मुंबई : मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा विकास करण्यासाठी स्थापित असलेल्या मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडूनच (एमआरव्हीसी) मराठीशी दुजाभाव केला. एमआरव्हीसीतर्फे आयोजित एका पत्रकार परिषदेसाठी एमआरव्हीसीने केवळ इंग्रजी पत्रकारांनाच निमंत्रण दिले. मराठी पत्रकारांना या परिषदेचे निमंत्रणच नव्हते. या दुय्यम वागणूकीचा मराठी वर्तमानपत्राच्या पत्रकारांनी निषेध केला आहे. या पत्रकार परिषदेत मध्य आणि पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. मात्र पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आपली भूमिका नसून ती एमआरव्हीसीकडून आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) ही भारतीय रेल्वेच्या आधीन असलेली कंपनी मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा विकास करण्यासाठी काम करते. या कंपनीचे मालकी हक्क भारतीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्याकडे ५१:४९ अशा टक्केवारीने आहेत. एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांकडून माहीती देण्याबाबत नेहमीच दुजाभाव केला जातो. याचा अनुभव मराठी आणि हिंदी पत्रकारांना पुन्हा एकदा आला. शुक्रवारी मराठी आणि हिंदी पत्रकारांना कोणतीही माहीती लागू न देता छुप्या रितीने एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सकाळी अकराच्या सुमारास पत्रकार परिषद आयोजित केली. यात फक्त इंग्रजी माध्यमांच्या पत्रकारांनाच आमंत्रण देण्यात आले. पत्रकार परिषद मध्य रेल्वे महाव्यवस्थापक सुनिल कुमार सूद यांच्या चेंबरमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यात पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक यांनाही बोलावण्यात आले. त्याचबरोबर या परिषदेत रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. मात्र याची साधी कुणकुणही मराठी वर्तमानपत्राच्या पत्रकारांना लागू दिली नाही. त्यामुळे याचा सर्व पत्रकारांकडून निषेध करण्यात आला.
याविषयी पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांना विचारले असता, एमआरव्हीसीकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकली.


एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, आम्हाला काही पत्रकारांना भेटायचे होते. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी बोलावले. यात काही गैर नाही आणि हा काही मुद्दा नाही.

Web Title: Secondary abuse of journalists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.