दुसरी बायको कर म्हणून कुटुंबियांनीच बदडले

By Admin | Updated: July 25, 2016 19:50 IST2016-07-25T19:50:23+5:302016-07-25T19:50:23+5:30

‘तू दुसरी बायको कर’ असा रेटा लावूनही न ऐकणाऱ्या युवकास कुटुंबियांनीच चक्क दगड-विटांनी मारहाण केली.

As a second wife's tax, the family just turned | दुसरी बायको कर म्हणून कुटुंबियांनीच बदडले

दुसरी बायको कर म्हणून कुटुंबियांनीच बदडले

ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. २५ : ‘तू दुसरी बायको कर’ असा रेटा लावूनही न ऐकणाऱ्या युवकास कुटुंबियांनीच चक्क दगड-विटांनी मारहाण केली. त्याच्या फिर्यादीवरून आई-वडिल, भाऊ-भावजयीविरोधात बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, कळमनुरी तालुक्यातील मौजे वारंगा येथील सचिन बळीराम जिनेवाड (३१) यास कुटुंबिय दुसरी बायको कर म्हणून गेले अनेक दिवसांपासून पाठीमागे लागले आहेत. पण कुटुंबियांच्या या मागणीला सचिन प्रतिसाद देत नव्हता.

२५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता गावातील शेताच्या रस्त्यावरून सचिन, त्याची पत्नी व मेहुणा बबलू बालाजी बोईनवाड जात होते. त्यावेळी कुटुंबियांनी याच कारणाने रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. विटाने, लाकडाने व थापडबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सचिन बळीराम जिनेवाड यांच्या फिर्यादीवरून बळीराम किशन जिनेवाड (वडिल), भागिरथी बळीराम जिनेवाड (आई), विजय बळीराम जिनेवाड (भाऊ), लक्ष्मी विजय जिनेवाड यांच्याविरूद्ध भादंविच्या ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार अशोक कांबळे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: As a second wife's tax, the family just turned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.