शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 08:00 IST

राज्यातील २३ नगरपरिषदांचे अध्यक्ष आणि १४३ सदस्य निवडण्यासाठीचे मतदान

मुंबई : राज्यातील २३ नगरपरिषदांचे अध्यक्ष आणि सदस्य तसे विविध नगरपरिषदा व नगर पंचायतींमधील १४३ सदस्य निवडण्यासाठीचे मतदान शनिवारी होणार असून पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २८८ नगरपरिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम ४ नोव्हेंबरला जाहीर केला होता. त्यानुसार २ डिसेंबरला २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले. उर्वरित ठिकाणी उद्या मतदान होणार आहे.

राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींसाठीची मतमोजणी २१ डिसेंबरला संबंधित ठिकाणी सकाळी १० वाजता सुरू होईल. सायंकाळपर्यंत सर्व निकाल हाती येतील अशी शक्यता आहे. महायुतीतील भाजप, शिंदेसेना आणि अजित पवार गट अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध लढले.

महापालिकांसाठी आयोगाचे निर्देश

महापालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी आणि आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पुरेशा भरारी पथकांची स्थापना करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी शुक्रवारी एका बैठकीत दिले.

वाघमारे यांनी राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेतली. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.

काकाणी यांनी बैठकीत सादरीकरण केले. महानगरपालिकेसंदर्भातील अधिनियम व राज्य निवडणूक आयोगाचे विविध आदेश यासंदर्भात त्यांनी माहिती दिली.

महापालिकांची रंगीत तालीम

विरोधी महाविकास आघाडीतील पक्षही अनेक ठिकाणी एकमेकांविरुद्ध रिंगणात होते. त्यामुळे निकालाबाबत कमालीची उत्सुकता आहे. राज्यातील लहान शहरांचा कौल कोणाला याचा फैसला या निमित्ताने होणार आहे. राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. त्यामुळेही नगर परिषद निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करावी

१. भरारी पथकांच्या माध्यमांतून आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी पुरेशा मनुष्यबळाची व्यवस्था करावी; तसेच कायदा व सुव्यवस्था चोख राखण्यासाठी पोलिस यंत्रणेसोबत समन्वय साधावा.२. त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित प्रभागांचे नकाशे, प्रभागातील जागानिहाय आरक्षण, नामनिर्देशनपत्र व शपथपत्राचे नमुने, इतर आवश्यक अधिकारी/कर्मचारी, आवश्यक साहित्य आदींची त्वरित व्यवस्था करण्यात यावी.३. २ डिसेंबर रोजी मतदान झालेल्या २६३ नगरपरिषदा व नगरपंचातीचा अनुभव लक्षात घेता मतदारांना सहज व सुलभरीत्या मतदान करता यावे, यासाठी मतदान केंद्रांवर किमान सेवा-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शक्य असलेल्या ठिकाणी आदर्श मतदान केंद्रे किंवा पिंक मतदान केंद्रांची उभारणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Second Phase of Municipal Council Elections Today; Results on Sunday

Web Summary : Maharashtra's municipal council elections' second phase occurs today, deciding council presidents and members. Results for both phases will be announced December 21st. State Election Commission prepares for smooth process, emphasizing strict code of conduct, with focus on voter convenience.
टॅग्स :Electionनिवडणूक 2025