अंबरनाथमध्ये तापाचा दुसरा बळी
By Admin | Updated: November 24, 2014 03:20 IST2014-11-24T03:20:39+5:302014-11-24T03:20:39+5:30
१२ दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये एका महिलेचा तापाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी एका सात वर्षांच्या मुलाचाही तापाने मृत्यू झाला

अंबरनाथमध्ये तापाचा दुसरा बळी
अंबरनाथ : १२ दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये एका महिलेचा तापाने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी एका सात वर्षांच्या मुलाचाही तापाने मृत्यू झाला. या मुलाला डेंग्यूची लागण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, पालिकेचे आरोग्य खाते ही शक्यता फेटाळत आहे.
१० नोव्हेंबर रोजी चिंचपाडा परिसरात तमाची मारन (२२) या महिलेचा तापाने मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच १५ नोव्हेंबरला राम चनई (७) या मुलाची प्रकृती बिघडली. त्याला ताप आल्याने अंबरनाथच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, त्याची प्रकृती बिघडतच गेल्याने त्याला लगेच ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथेही त्याने उपचाराला प्रतिसाद न दिल्याने शुक्रवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. राम याला डेंग्यूसदृश तापाची लागण झाली होती. (प्रतिनिधी)