दुसऱ्या यादीचीही ‘कट आॅफ’ नव्वदी पार

By Admin | Updated: July 1, 2015 00:30 IST2015-07-01T00:30:13+5:302015-07-01T00:30:13+5:30

दहावी बोर्डाच्या विक्रमी निकालाचे पडसाद यंदा अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या मेरिट लिस्टवर दिसून येत आहेत. मंगळवारी जाहीर झालेल्या अकरावी आॅनलाइन

The second list of 'cut off' crossed the ninety-nine | दुसऱ्या यादीचीही ‘कट आॅफ’ नव्वदी पार

दुसऱ्या यादीचीही ‘कट आॅफ’ नव्वदी पार

मुंबई : दहावी बोर्डाच्या विक्रमी निकालाचे पडसाद यंदा अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या मेरिट लिस्टवर दिसून येत आहेत. मंगळवारी जाहीर झालेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेशाच्या दुसऱ्या मेरिट लिस्टमध्ये कट आॅफने नव्वदी पार केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत कट आॅफची टक्केवारी यंदा चार ते पाच टक्क्यांनी वाढली आहे.
दुसऱ्या यादीनंतर ४४ हजार १२३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यानुसार १0 हजार ४६४ नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला असून, बेटरमेंटचा पर्याय ३३ हजार ६५९ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. पहिल्या पसंतीचे कॉलेज दुसऱ्या यादीतील ६९२ विद्यार्थ्यांना मिळाले आहे. आतापर्यंत २ लाख ३२ हजार २८१ जागांवरील प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.

महाविद्यालयांची कट आॅफ लिस्ट

पोद्दार कॉलेज
वाणिज्य -९१.८०%
केळकर कॉलेज
कला-७९.४०%
वाणिज्य -८९.८०%
विज्ञान -९२.८०%
एनएम कॉलेज
वाणिज्य -९२.४०%
रुईया कॉलेज
कला -९०.८०%
विज्ञान -९२.८०%
साठ्ये कॉलेज
कला- ४८%
वाणिज्य -८८.२०%
विज्ञान- ९३.१७%
बिर्ला कॉलेज
वाणिज्य- ८६.४०%
विज्ञान -९१.८०%
खालसा कॉलेज
कला -५६.७१%
वाणिज्य - ८५.८०%
विज्ञान -८५.६०%
झुनझुनवाला कॉलेज
वाणिज्य -८६.६०%
कला -३६%
विज्ञान - ८९.४०%
सोमैया विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय
सायन्स -९० %
कॉमर्स - ८८ %
केजे सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालय
आटर््स- ६५.८३ %
कॉमर्स -७३.३३%

Web Title: The second list of 'cut off' crossed the ninety-nine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.