शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पहाटेपासून शोधमोहीम

By admin | Updated: August 4, 2016 05:38 IST

बुधवारी पहाटे ६ वा.पासून सागरी तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ तसेच पोलीस दलासह महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी संपूर्ण नदीच्या पात्रात शोधमोहीम सुरू केली आहे.

संदीप जाधव,
 
महाड- अंधार आणि मुसळधार पावसामुळे मंगळवारी मध्यरात्रीच्या आधी झालेल्या दुर्घटनेनंतर शोधमोहीम सुरू करणे अशक्य होते. त्यामुळे बुधवारी पहाटे ६ वा.पासून सागरी तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ तसेच पोलीस दलासह महाबळेश्वर ट्रेकर्स यांनी संपूर्ण नदीच्या पात्रात शोधमोहीम सुरू केली आहे. 
दोन हेलिकॉप्टर्ससह पाणबुड्या व स्पीडबोट्स यांच्याआधारे बेपत्ता वाहने व प्रवाशांचे शोधकार्य दिवसभर सुरू होता. मात्र दिवसभराच्या शोधानंतरही एसटीच्या बसेस, खासगी वाहने वा प्रवासी यांच्यापैकी कोणाचाच शोध लागला नाही. संध्याकाळनंतर अंधारामुळे हेलिकॉप्टद्वारे घेतला जाणारा शोध थांबवण्यात आला. आता गुरुवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू होईल.या दुर्घटनेचे वृत्त समजताच मध्यरात्रीच रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली, जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम, डीवायएसपी प्रांजली सोनावणे आदिंनी घटनास्थळी धाव घेवून यंत्रणा युद्धपातळीवरून राबवली. सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे शोधमोहीमेचे काम मोठ्या जिकिरीचे बनल्याचे दिसून आले. 
जुन्या पुलाला समांतर असा नवीन पूल गेल्या १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आला आहे. त्यानंतर जुन्या पुलाचा वापर कोकणातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी केला जात होता, तर नवीन पुलाचा वापर कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता देशपांडे यांनीही घटनास्थळाची बुधवारी दुपारी पाहणी केली.
>बघ्यांच्या गर्दीमुळे शोधकार्यात अडथळे
एनडीआरएफच्या ९० जवानांची फौज सहा बोटींसह शोधकार्यात मग्न असून बघ्यांच्या गर्दीमुळे त्यातअडथळा निर्माण होत होता. सावित्री नदीच्या जोरदार प्रवाहाच्या पाण्याचा अंदाज घेण्यासाठी रिव्हर रॉफ्टिंगची टीमही दाखल झाली आहे. कोसळलेल्या पुलाच्या लगतच असलेल्या समांतर पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. घटनास्थळापासून महामार्गावर दुतफर् ा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत होत्या. नेमकी किती 
वाहने पात्रात 
वाहून गेली वा किती जण बेपत्ता आहेत याबाबत अद्यापही अधिकृत माहिती प्रशासनाला मिळालेली नसल्याने केवळ अंदाज बांधले 
जात आहेत. 
>वाहून गेलेल्या एसटी बसमधील बेपत्ता प्रवासी
जयगड - मुंबई 
(एम.एच.२०/डीएल-१५३८)
१. अविनाश सखाराम मालप (रा.लावगंध-खंडाळा,जयगड)
२. प्रशांत प्रकाश माने 
(२९, रा.भंडारपुळे, रत्नागिरी)
३. सुनिल महादेव बैकर 
(३५, जयगड)
४. स्रेहल सुनिल बैकर 
(३०, जयगड)
५.धोंडू बाबाजी कोकरे 
(५५, रा.वरवडे जि. रत्नागिरी)
६. भुमी भुषण पाटेकर (२६, रा. लावगंध-खंडाळा, जयगड)
७.संतोष बळेकर (१२, रा. लावगंध-खंडाळा जयगड)
८.जितेश जैतापकर (३३, रा. जैतापूर, ता.राजापूर-रत्नागिरी)
९. सुरेश नेमाजी सावंत (६०, रा.बावनदी,रत्नागिरी)
१०.एस.एस.कांबळे (बस चालक)
११.व्ही.के.देसाई (बस वाहक)
 
राजापूर -बोरीवली 
(एमएच-४०/एन९७३९)
१.भिकाजी रामचंद्र वाघझरे, 
(७९, मु. गुरव चाळ , गणेश नगर,बेहरमबाग जोगेश्वरी, मुंबई)
२. विजय विश्राम पंडित (मुंबई)
३. विनीता विश्राम पंडित (मुंबई)
४. अवेश अल्ताफ चौगुले( १८) 
५. असिफ अहमद चौगुले (२०)
६. जी. एस. मुंडे (बस चालक)
७. पी. बी. शिर्के (बस वाहक) 
>मुंबई-गोवा महामार्ग वाहतूक सुरूच !
गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेणजवळच्या भोगावती नदीवर नवा पूल बांधून दोन वर्षे झाली आहे. मात्र अनेक दिवस हा पूल वाहतुकीसाठी खुला केला नव्हता. परिणामी भोगवतीवर बांधण्यात आलेल्या जुन्याच पुलावरून वाहतूक सुरू आहे. 
हा पूलही ब्रिटिशकालीन असून कमकुवत झाला आहे. नवीन पूल अलीकडच्या काळात वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला असला तरी जुन्या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आलेली नाही. 
सद्य:स्थितीत या जुन्या धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू असल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे पुलावरून ये-जा करणाऱ्या एसटीचालक व अवजड वाहनचालकांचे म्हणणे आहे. 
>जिल्ह्यातील तीन पूल कोसळले, २८ गावांचा संपर्क तुटला
यंदाच्या पावसाळ््यात आतापर्यंत गोवा राष्ट्रीय महामार्ग वगळता जिल्ह्यातील अन्य मार्गावरील पूल कोसळून वाहतूक बंद झाल्याची उदाहरणे आहेत. पोलादपूरमधील वझरवाडी पूल तुटल्याने १४ गावांचा संपर्क तुटला आहे. 
तळा तालुक्यातील मांदाड-म्हसळा मार्गावरील वरळ पूल तुटल्याने १५ गावांचा संपर्क तुटला आहे. पनवेल तालुक्यातील उमरोली येथील पूल तुटल्याने सुमारे ९ गावांचा संपर्क तुटला आहे. रोहा अष्टमी येथील जुन्या पुलावर कुंडलिका नदीच्या पुराचे पाणी येते. सोमवारीच तशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. 
पुलाची धोकेविषयक तपासणी झालेली नाही. नागोठणे शहरातून बाहेर पडण्याकरिता अंबा नदीवर असलेल्या शिवकालीन पुलाला देखील अंंबा नदीचे पाणी लागलेले आहे. हा पूल देखील धोकादायक आहे किंवा नाही याबाबतची तपासणी झालेली नाही.
नियंत्रण कक्ष संपर्क : 
रायगड जिल्हा नियंत्रण कक्ष-टोल फ्री क्र मांक-१०७७, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष-०१२४१-२२२११८, मुंबई सेंट्रल बसस्थानक-०२२-२३०७४२७२ / २३०७६६२२, महाड बस स्थानक-०२१४५-२२२१३९/ २२२१०२, पोलादपूर बसस्थानक- ०२१९१-२४००३६, चिपळूण बसस्थानक - ०२२३५५ /२५२००३/२५२१६७, रत्नागिरी बसस्थानक-०२३५२-२२२१०२/२२२२५३, राजापूर बसस्थानक-०२३५३-२२२०२९/२२२२१८