सिनेट निवडणुकीसाठी विद्यार्थी संघटनांकडून पदवीधरांचा शोध
By Admin | Updated: July 4, 2015 03:12 IST2015-07-04T03:12:29+5:302015-07-04T03:12:29+5:30
विद्यापीठाच्या दहा पदवीधर सिनेट सदस्यांच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच विद्यार्थी संघटनांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मतदार यादीत सुमारे ४६ हजार पदवीधर

सिनेट निवडणुकीसाठी विद्यार्थी संघटनांकडून पदवीधरांचा शोध
मुंबई : विद्यापीठाच्या दहा पदवीधर सिनेट सदस्यांच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर होताच विद्यार्थी संघटनांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. मतदार यादीत सुमारे ४६ हजार पदवीधर असून त्यांच्यासह नवीन पदवीधरांची नोंदणी करण्यासाठी विद्यार्थी संघटनांनी पदवीधर विद्यार्थ्यांचा शोध सुरु केला आहे.
यंदापासून विद्यापीठाने आॅनलाइन नोंदणी सुरु केल्याने पदवीधरांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा निवडणूक अधिकाऱ्यांना आहे. तर दुसरीकडे पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यासाठी सर्वच विद्यार्थी संघटना जोमाने कामाला लागल्या आहेत. निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या गुप्त बैठका सुरु आहेत.
२0१0 पूर्वी पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना केवळ विद्यापीठाचा ‘ब’ फॉर्म भरावा लागेल. तर २0१0 नंतर पदवी प्राप्त केलेल्या आणि यापूर्वी विद्यापीठाच्या नोंदवहीत नाव नोंंद न केलेल्या विद्यार्थ्यांना ‘अ’आणि ‘ब’ अर्ज भरावा लागणार आहे.
त्यामुळे विद्यार्थी संघटना यापूर्वी विद्यापीठाकडे नाव नोंद केलेल्या आणि आतापर्यंत नाव नोंद न केलेल्या पदवीधरांकडून अर्ज भरुन घेत आहेत. (प्रतिनिधी)
दुरुस्त्यांमुळे ६ लाख अर्ज रद्दीत
सिनेट निवडणुकीसाठी विद्यापीठाने सुमारे ६ लाख अ आणि ब अर्ज छापले. मात्र, त्यामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना विद्यार्थी संघटनांनी सुचविल्याने हे अर्ज विद्यापीठाने रद्द केल्याने विद्यापीठाचे नुकसान झाल्याचा आरोप सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केला. मात्र यंदा केवळ १ लाख अर्ज छापले असून यामध्ये कोणतेही नुकसान नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.