‘त्या’ फेसबुक पोस्टचा शोध सूरू
By Admin | Updated: February 22, 2015 01:37 IST2015-02-22T01:37:46+5:302015-02-22T01:37:46+5:30
अमोल पाटील नावाच्या तरुणाच्या फेसबुक पेजवर डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आलेला होता.

‘त्या’ फेसबुक पोस्टचा शोध सूरू
पुणे : एका तरुणाच्या फेसबुक पेजवर कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरेंच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. ही पोस्ट टाकणारा नेमका कोण आहे, ही पोस्ट नेमकी कुठून टाकण्यात आली याचा पुणे पोलीस शोध घेत आहे, अशी माहिती सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त राजेश बनसोडे यांनी दिली.
अमोल पाटील नावाच्या तरुणाच्या फेसबुक पेजवर डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या मृत्यूबाबत आक्षेपार्ह मजकूर अपलोड करण्यात आलेला होता. त्यानंतरही त्याने आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या नावानेही धमकीची पोस्ट टाकली. या पोस्टचा स्क्रीन शॉट शनिवारी दिवसभर व्हॉट्स अॅपवरून फिरत होता. या पोस्टला ६० पेक्षा अधिक लाईक्स तसेच ३० पेक्षा अधिक कमेंटही मिळालेल्या आहेत.
कोल्हापूर पोलिसांसह अन्य तपास यंत्रणाही त्याचा शोध घेत आहेत. त्या पोस्टचा आयपी अॅडे्रस पोलिसांनी सर्च करायला सुरुवात केली आहे. पुणे पोलिसही या पाटीलच्या आयपी अॅडे्रसवरुन त्याचा शोध घेत आहेत, असे बनसोडे यांनी सांगितले.