भुसावळात बोगस डॉक्टरचा दवाखाना सील
By Admin | Updated: March 25, 2017 13:34 IST2017-03-25T13:34:36+5:302017-03-25T13:34:36+5:30
वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पाटील हा रुग्णांवर उपचार करीत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली़

भुसावळात बोगस डॉक्टरचा दवाखाना सील
भुसावळ, दि. 24- शहरातील काझी प्लॉट भागातील गोपाळ पाटील या बोगस वैद्यकीय व्यावसायिकाचा दवाखाना पंचांसमक्ष शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सील करण्यात आला. या कारवाईने शहरात खळबळ उडाली.
वैद्यकीय व्यवसायाची पदवी नसताना गेल्या आठ ते दहा वर्षांपासून पाटील हा रुग्णांवर उपचार करीत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली़ नगरपालिका दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ़. कीर्ती फलटणकर, प्रभारी आरोग्याधिकारी अशोक फालक, प्रदीप पवार, वसंत राठोड यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली़
जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिका:यांनी पालिकेच्या मुख्याधिका:यांना 20 मार्च रोजी पत्र पाठवून दवाखाना सील करण्याची कारवाई करण्याचे कळवले होते. त्यानुसार 25 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली़